दोन्ही उड्डाण पूलाचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

अखेर दास्तान फाटा ते चिर्ले आणि रांजणपाडा या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगवरील  ६६.४० कोटी खर्चाच्या उड्डाण पूलांचे लोकार्पण 

उरण : मागील चार वर्षांपासून रखडलेल्या जासई दास्तान फाटा ते चिर्ले रेल्वे क्रॉसिंग वरील १२५० मीटर लांबीचा (१.२ किमी ) आणि रांजणपाडा रेल्वे क्रॉसिंग या दोन्ही उड्डाण पूलाचे बुधवारी (दि१६) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.दोन्ही उड्डाणपूलांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.यामुळे नोकरदार, प्रवासी, वाहन चालक यांना दररोजच्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
   
जासई -दास्तान फाटा ते दिघोडे या रस्त्यावरील जासई - चिर्ले रेल्वे क्रॉसिंग वरुन दररोज जड-अवजड आदी हजारो वाहनांची वर्दळ असते.मात्र दर २० मिनिटांनी धावणाऱ्या मालवाहू रेल्वेमुळे  या मार्गावरील रेल्वे फाटकावर  मोठ्या प्रमाणावर वाहतूकीची कोंडी होत असते. त्यामुळे दास्तान फाटा
ते चिर्ले दरम्यान रेल्वे लेव्हल क्रासिंग क्र-२ हा १२५० मीटर लांबीचा आणि ४७.०२ कोटी खर्चाचा तसेच रांजणपाडा रेल्वे लेव्हल क्रासिंग क्र-३ हा १०१० लांबीचा आणि १९.३८ कोटी खर्चाचे दोन उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते.या दोन्ही उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (१६) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

उरण परिसरातील रखडलेल्या प्रकल्पांना, विकास कामांना गती देण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे. रेल्वे क्रॉसिंग वरून प्रवास करणाऱ्या नोकरदार प्रवासी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असे.अशा प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याप्रसंगी नमुद केले.यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, उद्योगपती जे.एम.म्हात्रे, अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, शहाराध्यक्ष कौशिक शहा, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष निळकंठ घरत, उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर आदी सह शासकीय अधिकारी, भाजपचे पदाधिकारी, प्रवासी नागरिक उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आचार्य अत्रे यांच्या जयंती निमित्त ठाणे महापालिका तर्फे विचारमंथन व्याख्यानमालेचे आयोजन