उरण शहरातील रस्त्यांवर सर्रास पार्किंगमुंळे उरणकर हैराण

उरण शहरातील रस्त्यांवर सध्या सर्रास आडवी उभी वाहने पार्किंग 

उरण :  उरण शहरातील सर्रास रस्त्यांवर सध्या आडवी उभी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामूळे उरण शहरातील शासकीय कार्यालयात, बाजारात ये - जा करणाऱ्या वाहनचालकांना, नागरीकांना ठिक ठिकाणी रस्त्यावर उदभवणाऱ्या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तरी शहरात उदभवणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उरण नगर पालिकेने पुढाकार घ्यावा अशी मागणी उरणची जनता करत आहे.

उरण शहर हे तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे या शहरातील विविध शासकीय कार्यालयात तसेच बाजारात सामानाची खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक ये - जा करत आहेत. मात्र अश्यातच काही बेशिस्त वाहन चालक मुद्दामहून आप आपली वाहने शहरातील रस्त्यांवर आडवी उभी पार्किंग करत आहेत. अशा वाहनांच्या पार्किंगमुळे पालवी रुग्णालय नाका, राजपाल नाका,राम रतन हाँटेल नाका, तहसील कार्यालय, मुस्लिम मोहल्ला या परिसरातील रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

त्यामुळे वारंवार उदभवणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्यांचा सामना हा नाहक नागरीकांना सहन करावा लागत आहे.त्यात अनेक वेळा बेशिस्त उर्मट भाषा व्यक्त करणाऱ्या वाहन चालकांबरोबर सामान्य नागरीकांना बाचाबाचीच्या प्रकरणात आपला संयम गमवावा लागत आहे. तरी उरण नगर पालिकेने येऊ घातलेल्या रक्षाबंधन, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव सणात उरण शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी म्हणून उपाययोजना करावी.अशी मागणी वाहतूक कोंडीच्या समस्यांनी त्रस्त झालेली उरणची जनता विशेष करून महिला भगिनी करत आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दोन्ही उड्डाण पूलाचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन