चंदनवाडी शिवसेना शाखेत ध्वजारोहण

 धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतील मध्यरात्रीच्या ध्वजारोहणाची परंपरा कायम

ठाणे : ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'चे खासदार राजन विचारे यांनी ठाणे मधील ‘शिवसेना'ची पहिली ऐतिहासिक चंदनवाडी शाखा येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्सवात साजरा करुन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची गुरुवर्यांची परंपरा कायम ठेवली. ‘सैनिक फेडरेशन'चे अध्यक्ष माजी सैनिक राजू पाटील यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाची अमर ज्योत प्रज्वलित करुन आपले प्राण गमावलेल्या भारतीय सैनिक  पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच भारतीय सैन्यातील वीरपत्नी, वीरमाता आणि पिता या सर्वांना सन्मानित केले. तद्‌नंतर निवृत्त पोलीस महासंचालक के. पी. रघुवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

१९७४-७५ पासून ‘शिवसेना'च्या वतीने दरवर्षी १४ ऑगस्टच्या रात्री १२.०१ वाजता ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला गेला. या नाविन्यपूर्ण ध्वजारोहण सोहळ्यास संपूर्ण ठाणेकरांनी उचलून धरले. दिघे यांच्या कल्पकतेचे कौतुक झाले. तेव्हापासून दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहण सोहळा साजरा होतो. तो संपूर्ण रोमांचकारी १०-१५ मिनिटांचा सोहळा चंदनवाडी येथे पार पडला.

याप्रसंगी खा. राजन विचारे, माजी सैनिक राजू पाटील, महिला अध्यक्ष शोभा थोरबोले, ‘शिवसेना'चे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मेणेरा, बेलापूर जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार
कोळी, संजय घाडीगावकर, सुनील पाटील, मनोज हळदणकर, नवी मुंबई महिला जिल्हासंघटक सौ. रंजना शिंत्रे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, सहसचिव विश्वास निकम, अनिष गाढवे,  सहप्रवक्ता तुषार रसाळ समन्वयक संजय तरे, महिला जिल्हा संघटक, समिधा सुरेश मोहिते, रेखा खोपकर, महिला उप जिल्हा संघटक महेश्वरी तरे,  आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, महिला शहर संघटक स्मिता इंदुलकर, वासंती राऊत, प्रमिला भांगे, युवती सेना राज्य सहसचिव धनश्री विचारे, पुजा भोसले, आरती खळे, आय टी सेल समन्वयक रोशनी शिंदे तसेच ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर येथील ‘शिवसेना'चे पदाधिकारी, युवासेना आणिो युवती सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीआरझेड परवानगीमध्ये बालाजी मंदिराच्या भूभागात ७५% कपात