सीआरझेड परवानगीमध्ये बालाजी मंदिराच्या भूभागात ७५% कपात

 

उल्लंघनांकडे दुर्लक्ष केल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप

नवी मुंबई : किनारपट्टी नियमन प्रभागाची (सीआरझेड) परवानगीमध्ये नवी मुंबईमध्ये साकारल्या जाणाऱ्या तिरुपती व्यंकटेश्वर मंदिराच्या बांधकाम करण्यायोग्य भूभागात जवळपास ७५ % कपात करण्यात आली आहे. सदरची कृती देखील बेकायदेशीर असल्याचे पर्यावरणवादी समुहांनी म्हटले आहे. ‘महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरण'ने (एमसीझेडएमए) मे २०२३ रोजी घेतलेल्या आपल्या १६७  व्या बैठकीमध्ये सीआरझेड परवानगी दिली होती. परंतु, सदर परवानगी देताना मंदिराचा काही भूभाग संपूर्णपणे तात्पुरत्या स्वरुपाच्या कास्टींग यार्डवर असल्याचे वास्तव विचारात घेतलेले नाही. १६ हेक्टरपेक्षा जास्त खारफुटींचा ऱ्हास करुन कास्टींग यार्ड निर्माण झाले असल्याचे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने सांगितले.

‘एमसीझेडएमए'च्या मिनिटस्‌मध्ये सिडको आणि तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) यांनी ४०,००० चौरस मीटर क्षेत्र मंदिरासाठी असल्याचे सादरीकरण केले असून त्यातील २७४८.१८ चौरस मीटर भाग सीआरझेड-१ए मध्ये,  २५६५६.५८ चौरस मीटर भूभाग सीआरझेड-२मध्ये अंतर्भूत होते. तर ११,५९५ चौरस मीटर क्षेत्र ‘सीआरझेड'मध्ये समाविष्ट होत नाही.

एमसीझेडएमएने केवळ सीआरझेड क्षेत्र नसलेल्या भागावरच म्हणजे ११,५९५ चौरस मीटर भागावर बांधकामाला परवानगी दिली आहे. सदर भाग वाटप केलेल्या ४०,००० चौरस मीटर (किंवा १० एकर) भूभागाच्या एक चतुर्थांश भागापेक्षा थोडा जास्त आहे.

उलवे नोड अंतर्गत न्हावे टोकावरील कास्टींग यार्डसाठी, १६ हेक्टर खारफुटींना मारुन आणि आंतरभरती पाणथळ क्षेत्रावर भराव घालून ‘एमएमआरडीए'ने पर्यावरण मंजूरी घ्ोतली होती. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (एमओइएफसीसी), एमएमआरडीए आणि जेआयसीए (व्घ्ण्ीं) सदर प्रकल्पासाठी वित्त देणाऱ्या संस्थांचे दस्तऐवज दाखवत कुमार सदर बाब उघड केली आहे. वन विभागाच्या खारफुटी संवर्धन कक्षाने ‘नॅटकनेवट'च्या तक्रारींवरुन क्षेत्राचे तात्काळ परीक्षण केले आणि मंदिरासाठी दिलेला भूभाग मूळतः पाणथळ क्षेत्र असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जून रोजी ११,५०० चौरस फुट क्षेत्रावर तिरुपती व्यंकटेश मंदिराची प्रतिकृती म्हणून उभारल्या जाणाऱ्या मंदिराचे भूमीपूजन केले आहे. बालाजी मंदिरासाठी कोणताही आक्षेप नाही; परंतु ‘सिडको'ने मंदिरासाठी दुसऱ्या ठिकाणच्या भूभाग द्यावा, असे बी. एन. कुमार आणि नंदकुमार पवार यांनी स्पष्ट केले.

मागील वर्षी एप्रिल मध्ये ‘सिडको'च्या वृत्तपत्र प्रकाशनाची ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी आठवण करुन दिली, ज्यामध्ये बालाजी मंदिराचा भूभाग मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कास्टींग यार्डच्या भागावर असल्याचे मान्य करण्यात आले होते. मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकचे (एमटीएचए) निर्माण करत असलेल्या ‘एमएमआरडीए'ने सप्टेंबर २०२३ पर्यंत १० एकर जमीन रिकामी करण्याचे मान्य केले असल्याचे ‘सिडको'च्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले गेले आहे. सदर विषय ‘एमसीझेडएमए'पासून लपलेला आहे. याबद्दल मिनिटस्‌मध्ये कोणताही उल्लेख केलेला नाही. -बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

खारफुटी आणि पाणथळ क्षेत्रावर नियंत्रण असलेल्या ‘सिडको'ने संपूर्णपणे बेकायदेशीर असलेल्या भरावाला स्थायी स्वरुप देण्याऐवजी जैवविविधता असलेल्या क्षेत्राचे पुनर्संग्रहण करणे आवश्यक आहे. -नंदकुमार पवार, अध्यक्ष-श्री एकवीरा आई प्रतिष्ठान.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेसाठी बैठक संपन्न