ठाणे येथे ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, गुणवंत अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थ्यांचा सन्मान

 ठाणे : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा पालघर/सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे संपन्न झाले. याप्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सह-पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, पोलीस उपायुक्त गावडे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल चव्हाण, तहसिलदार युवराज बांगर, संजय भोसले, निलीमा सूर्यवंशी, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

यावेळी ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने यावेळी राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली. तसेच यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीताची धून वाजविण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ठाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे नातेवाईक दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त, मोतीलाल शंकर धोंगडे, भगवान दलाल या स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा पत्नी प्रमोदिनी भगवान दलाल, लजबर खान मखमदुल्ला पठाण यांच्या विधवा पत्नी मरियम लजबरखान पठाण, अनाथबंधू चित्तरंजन चक्रवर्ती यांच्या विधवा पत्नी मिता अनाथबंधू चक्रवर्ती, दयाराम विजयाराम इसरानी यांच्या विधवा पत्नी मीरा दयाराम इसरानी, बाबूराव वामन जेरे यांच्या विधवा पत्नी श्रीमती सुचेता बाबूराव जेरे, गणेश दत्तात्रय पाठक यांच्या विधवा पत्नी सुनंदा गणेश पाठक, जामसिंह राजपूत यांच्या विधवा पत्नी पुष्पादेवी जामसिंह राजपूत, लक्ष्मण फडोळ यांच्या विधवा पत्नी शांताबाई लक्ष्मण फडोळ, नरसिंह यल्लेवार यांच्या विधवा पत्नी चंद्रकला नरसिंह यल्लेवार, यदूनंदनप्रसाद शहा यांच्या विधवा पत्नी कौशल्यादेवी यदूनंदनप्रसाद शहा यांचा ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या ठाणे जिल्ह्यातील  अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकारांचाही जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच केंद्र शासनाकडून गुणवत्तापूर्ण सेवेकरिता पदक घोषित झाल्याबद्दल पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर आस्थापनेवरील अधिकाऱ्यांचा आणि कर्तव्य बजावताना प्रशंसनीय सेवेबद्दल कल्याण जिल्हा कारागृह उपअधीक्षक तथा प्रभारी अधीक्षक राजाराम रावसाहेब भोसले, ठाणे मध्यवर्ती कारागृह तुरुंगाधिकारी श्रेणी-१ उमरावसिंग प्रताप पाटील, सुभेदार विजय बाबाजी परब, बाळासाहेब सोपान कुंभार, विजय लडकू पाटील (राष्ट्रपती पदक जाहीर), हवालदार गणेश पांडूरंग घोडके (राष्ट्रपती पदक जाहीर), शिपाई स्वाती पांडूरंग गुरव यांचा सन्मान करण्यात आला. पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

राज्य अधिस्वीकृती समिती, विभागीय अधिस्वीकृती समिती मध्ये ठाणे जिल्ह्यातील मनोज जालनावाला, संजय मलमे, जयेश सामंत, संजय पितळे या पत्रकारांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता सुनिल धानके यांनी केले. तर उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सलग पावसाने भाजीपाला लागवडीवर परिणाम