ठाणे महापालिकेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

सफाई कर्मचारी गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित

ठाणे : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 76वा वर्धापन दिन ठाणे महानगरपलिकेच्यावतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि टीडीआरएफ यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर, ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्काराने आयुक्त  अभिजीत बांगर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर, इर्शाळवाडीसह इतर आपत्तींमध्ये बचाव आणि मदत कार्य करणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या (टीडीआरएफ) 33 जवानांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी ठाणे महापालिका परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, परिवहन समितीचे सदस्य तानाजी पाटील, माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेवक संदीप लेले, माजी नगरसेवक विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 ध्वजारोहणानंतर महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमांना, तसेच महनीय व्यक्तींच्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

समतादूतांचा पुणे ते मंत्रालयापर्यंत पायी लाँग मार्च