शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
‘श्रमिक सेना'च्या पाठपुराव्याला यश
एनएमएमटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकीत रक्कम प्राप्त
नवी मुंबई : ‘एनएमएमटी श्रमिक सेना'च्या अविरत पाठपुराव्यामुळे नवी मुंबई महापालिका परिवहन सेवा अर्थात ‘एनएमएमटी'च्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकीत रक्कम प्राप्त झाली आहे.
‘श्रमिक सेना'च्या माध्यमातून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात १५ दिवसांपूर्वी पत्र देण्यातआले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने आयुक्त नार्वेकर यांनी १० ऑगस्ट रोजी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात ‘श्रमिक सेना'चे अध्यक्ष संजीव नाईक यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी आयुक्त नार्वेकर यांच्यासोबत संजीव नाईक, सरचिटणीस चरण जाधव तसेच सेंट्रल कमिटीचे सदस्य यांच्याशी कामगारांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. त्यावेळी आयुवतांनी
कामगारांची आर्थिक थकबाकी लवकरच देण्याचे मान्य केले. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी कामगारांच्या खात्यावर १ जानेवारी ते ३१ मे २०२३ या कालावधीतील महागाई भत्त्याची रक्कम ७२ लाख रुपये लगेच जमा करण्यात आली. याबद्दल परिवहन सेवेच्या कामगारांनी ‘श्रमिक सेना'च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच महापालिका आयुवत राजेश नार्वेकर, परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुस्कर, मुख्य लेखा-वित्त अधिकारी आदिंचे आभार व्यक्त केले आहेत.