उरणचे डोळ्यांचे डॉक्टर अमोल गिरी यांची अनोखी समाजसेवा

 मागील १२ वर्षापासून घेतात रिक्षा चालकांच्या डोळ्यांची काळजी

उरण - सध्या वैद्यकिय क्षेत्र म्हणजे निव्वळ पैसा कमावण्याचे साधन झाले आहे. गरीबांना उपचार करणे अवघड झाले आहे. अशा वेळी उरण येथिल सुप्रसिद्ध डोळ्यांचे डॉक्टर अमोल सुखदेव गिरी हे मागील १२ वर्षापासून रिक्षा चालकांचे डोळे तपासून त्यांच्यावर मोफत उपचार करत आहेत. उरण शहरातील व्हिजन आय हॉस्पिटलमध्ये ते कॉम्प्यूटर द्वारा डोळे तपासून रिक्षा चालकांवर मोफत इलाज करत आहेत. त्यांच्या समाजसेवेमुळे ते रिक्षा चालकांच्या डोळ्याची काळजी घेणारा डॉक्टर अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

उरण तालुक्यातील नेत्ररोग तज्ञ डॉ अमोल गिरी व त्यांची पत्नी त्वचारोग तज्ञ डॉ सविता गिरी हे सातत्याने कोणतेतररी सामाजिक उपक्रम राबवत असतात. ते रिक्षा चालकांबरोबर गरीब नागरीकांवर देखिल मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार करतात. एकीकडे वैद्यकीय क्षेत्रात सर्वत्र पैसा उकळण्याचा धंदा सुरू असताना हे डॉक्टर दांपत्य १२ वर्षा पासून समाजाची सेवा म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या या समाजभिमुख कार्याबद्दल रिक्षा चालक संघटनेचे जयराम पाटील, महेश पाटील, सुभाष माळी आणि इतर रिक्षा चालकांनी समाधान व्यक्त केले असून गरीबांची जाण असलेल्या गिरी डॉक्टरांसारखे समाजभिमुख काम करावे असे आवाहन केले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एबस्टेनॉइड हार्ट नावाच्या दुर्मिळ हृदय विकाराने ग्रस्त रुग्णावर यशस्वी उपचार