एबस्टेनॉइड हार्ट नावाच्या दुर्मिळ हृदय विकाराने ग्रस्त रुग्णावर यशस्वी उपचार

लीडलेस पेसमेकर यशस्वीरित्या रोपण करण्याची शस्रक्रिया खारघर मधील मेडिकवर हॉस्पिटल मध्ये यशस्वीरित्या पार

नवी मुंबई : एबस्टेनॉइड हार्ट सारखा जन्मजात दुर्मिळ हृदयविकाराचा आजार असलेल्या 76 वर्षीय रुग्णावर जगातील सर्वात लहान (बुलेटच्या आकाराचे) लीडलेस पेसमेकर यशस्वीरित्या रोपण करण्याची शस्रक्रिया खारघर मधील मेडिकवर हॉस्पिटल मध्ये यशस्वीरित्या पार पडली आहे. डॉ.अभय जैन (सीव्हीटीएस सर्जन) आणि डॉ.अनुप महाजनी (इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट) यांच्या टिमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली असून सर्वात लहान आकाराचा पेसमेकर बसविल्यात आलेला हा पहिलाच रुग्ण ठरला आहे.
 संतोष कदम (बदलले नाव) यांना एबस्टेनॉइड हार्ट (एब्स्टेनची विसंगती) त्रास आढळून आला होता. त्यामुळे लहानपणापासूनच हृदयाची असामान्य रचना असलेल्या या रुग्णाच्या दोन्ही पायांना सूज येणे तसेच दम लागणे असा त्रास जाणवत होता. या रुग्णाच्या तपासणीत हृदयाच्या उजव्या बाजूच्या खालच्या वेंट्रिकल मध्ये दाब येत असल्यामुळे या रुग्णाला गंभीर ट्रायकस्पिड रेगर्गिटेशनचे निदान झाले. डॉ. अभय जैन यांनी त्याच्यावर बायोप्रोस्थेटिक व्हॉल्व्ह बदलून ऑपरेशन केले.

एबस्टाईनची विसंगती म्हणजे जन्माच्या वेळी हृदयासंबंधी आढळून आलेली विकृती. ट्रायकस्पिड व्हॉल्व्ह हा हृदयाच्या उजव्या बाजूला असलेल्या दोन मुख्य झडपांपैकी एक आहे. ट्रायकस्पिड रेगर्गिटेशन या विकारामध्ये झडपा पुर्णत बंद होत नाहीत, त्यामुळे दम लागणे, धडधडणे, पायावर सूज येणे यांसारखी लक्षणे जाणवतात. त्यामुळे संपूर्ण हार्ट ब्लॉक होण्याचा धोका होता. या केसमध्ये रुग्णाच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर लीडलेस पेसमेकर लावण्याबाबत त्यांना माहिती दिली. त्यानंतर ट्रायकस्पिड रीगर्जिटेशनशिवाय ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. एब्स्टाईन विसंगतीचा प्रकार हा 2 लाखांपैकी एका व्यक्तीमध्ये आढळून येतो. जन्मजात हृदयरोगांपैकी याचे प्रमाण 0.2 टक्के आहे.  

या रुग्णामध्ये बसविण्यात आलेले डयुअल-चेंबर लीडलेस पेसमेकर हे हाय एंड तंत्रज्ञान (2.6 सें.मी. बुलेटच्या आकाराचे) आहे. हे शरीरात चिरफाड न करता हृदयाच्या उजव्या बाजूला बसविले जाते. हे लीडलेस पेसमेकर रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारचा संसर्ग निर्माण करत नाही. नियमित पेसमेकर च्या तुलनेत ते आकाराने लहान असून त्याचे वजन 1.75 ग्रॅम आहे. तसेच त्याचा आवाज 0.8 सीसी असून त्याची लांबी 2.6 सेमी इतकी आहे. पारंपारिक पेसमेकरच्या तुलनेने यात छातीवर कोणत्याही प्रकारची चिरफाड केली जात नाही किंवा त्याचा डागही पडत नाही. ते थेट पायातील रक्तवाहिन्या द्वारे हृदयात टाकले जाते. ही एक नॉन-सर्जिकल प्रक्रिया आहे, जेथे टाके न टाकता उजव्या फेमोरल व्हेनद्वारे उजव्या वेंट्रिकल मध्ये मायक्रो एव्हीने घातली जाते.  

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्रीगणेशमूर्तींच्या दरात १० ते १५ % वाढ