सेंट मेरी विद्यालयात आग

शाळा व्यवस्थापन, जेएनपीए प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी

उरण :  जेएनपीए बंदर वसाहती मधील सेंट मेरी विद्यालयात ११ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर शाळेत लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाला नियंत्रण आणण्यास यश आले. सुदैवाने शाळा बंद असताना आग लागल्याची घटना घडल्याने मोठे संकट टळले गेले. परंतु, या घटनेनंर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

उरण परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून जेएनपीए बंदर वसाहतीमधील सेंट मेरी विद्यालयाकडे पाहिले जाते. याच सेंट मेरी विद्यालयामध्ये ११ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यावेळी वसाहतीमधील रहिवाशांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शाळेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, सदरची आग शॉर्टसर्किटमुळे केबलला लागली असून शाळेचे मोठे नुकसान झालेले नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण, शाळा सुरु असताना आगीची घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता, अशी वसाहतीमधील रहिवाशांनी व्यवत केली आहे. या घटनेनंतर सेंट मेरी विद्यालयाचे प्राचार्य, शाळा व्यवस्थापन तसेच जेएनपीए बंदर प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरणचे डोळ्यांचे डॉक्टर अमोल गिरी यांची अनोखी समाजसेवा