उरण पुर्व विभागातील खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात चर्चा

उरण पुर्व विभागातील वीज समस्यांबद्दल महावितरणचे उप अभियंता यांच्यात सकारात्मक चर्चा 

उरण : उरण पुर्व विभागातील रहिवाशांना करण्यात येत असलेला विद्युत पुरवठा हा सातत्याने खंडित होत असल्याने सदर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी उरण महावितरण विभागाने पुढाकार घ्यावा या मागणीसाठी महावितरण उरणचे उप अभियंता विजय सोनवणे यांची भेट उरण येथील कार्यालयात शिवसेनेचे ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख संतोष ठाकूर तसेच पुर्व विभागातील पत्रकार यांनी शुक्रवारी ( दि११) घेतली. यावेळी विद्युत पुरवठ्या संदर्भा दोघांमध्ये सकारात्मक चर्चा पार पडली.

उरण पुर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, बांधपाडा, पिरकोण, सारडे, वशेणी, पुनाडे,आवरे, गोवठणे आदि ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना महावितरण कंपनीकडून करण्यात येणारा विद्युत पुरवठा हा रात्री अपरात्री सातत्याने खंडित होत आहे.त्यामुळे गुहीणीना,छोटे मोठे व्यवसायिक, आजारी रुग्ण,कला नगरातील मुर्तीकार यांना त्रास सहन करावा लागत आहे.या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख संतोष ठाकूर तसेच पुर्व विभागातील पत्रकार यांनी शुक्रवारी ( दि११) महावितरण कार्यालय उरण चे उप अभियंता विजय सोनवणे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भा चर्चा केली.

यावेळी तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व पत्रकार सुर्यकांत म्हात्रे यांनी बांधपाडा व दिघोडे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने सब स्टेशन उभारण्याची तसेच भेंडखळ खाडीतील केबल तसेच विद्युत पोल रस्त्यालगत हलविण्याची मागणी केली. याप्रसंगी उप अभियंता विजय सोनवणे यांनी लवकरच लवकर हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.तसेच गणेशोत्सवात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सध्या महावितरण कंपनीचे कर्मचारी काम करीत असल्याचे नमूद केले.यावेळी उरण तालुका दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जीवन केणी, पत्रकार सुर्यकांत म्हात्रे,पत्रकार राजकुमार भगत, उपाध्यक्ष महेश भोईर सह महावितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे शहरातील काही भागात आज ५० टक्के पाणीपुरवठा