उपजिल्हा रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणाने गेल्या दहा वर्षांपासून कागदावरच

उरणचे उप जिल्हा रुग्णालय कागदावरच

उरण :  उरण तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातून आवश्यक असणारे उपजिल्हा रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणाने गेल्या दहा वर्षांपासून कागदावरच राहिले असल्याने उरणच्या जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.

उरण च्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने एक सुसज्ज रुग्णालय असावे यासाठी उरणच्या जनतेने तसेच उरण सामाजिक संस्थेने २०१० पासून मागणी करीत आहेत.या साठी विविध पक्षाच्या नेत्यानी ही पुढाकार घेतला आहे.त्या अनुषंगाने  २०११ मध्ये उरण तालुक्यात उपजिल्हा रुगणालय उभारण्याची घोषणा सरकारने केली. त्यानंतर सिडकोच्या माध्यमातून उरण पनवेल मार्गावरील वायू विद्युत केंद्राच्या कामगार वसाहती शेजारी भूखंड ही मंजूर करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रथम ५ कोटी त्यानंतर  ५७ कोटी रुपयांचा निधी ही मंजूर करण्यात आला.तरीही उरण मध्ये रुग्णालयाच्या उभारणीस सुरुवात झालेली नाही. 

मागील वर्षी पालक मंत्राच्या दरबारात १०० खाटांच्या रुग्णालयाचा मुद्धा उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उपस्थित केला आणि पालक मंत्रांनी सर्व विभागांना त्वरित पाहणी करण्याचे आदेश हि दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून संबंधित विभागाणी पाहणी ही केली.मात्र एक वर्षांनंतर ही कोणती ही कारवाई होताना दिसली नसल्याचे जनतेत सध्या बोलले जात आहे.

उरणमध्ये  केंद्र शासनाचे विविध प्रकल्प आहेत जेएनपीए बंदर सारखा मोठा प्रकल्प  वर आधारित अनेक प्रकल्प आहेत.

उरण तालुका हा राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा तालूका असतांनाही येथील जनतेला उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई व पनवेल येथे जावे लागत आहे. उरण मधील रुग्णांना २० ते ३० किलो मीटरवरचे अंतर पार करीत असतांना वेळीच उपचार न झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. येथील अनेक प्रकल्पांचा सी एस आर फंड हा  बाहेर राज्यात वापरला जात आहे. मात्र येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी हा निधी वापरला जात नाही ही खंत व्यक्त केली जात आहे.तरी उरण परिसरातील कंपन्यांनी आपला सी एस आर फंड दिला असता तर अनेक युवकांचे प्राण वाचले असते .

    उरण येथील उप जिल्हा रुग्णालयासाठी सिडकोने भूखंड सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केला आहे.परंतु जे १०० खाटांचे रुग्णालय बांधायचे आहे.ज्या ज्या गोष्टी रूग्णालयात हव्या आहेत त्या अनुषंगाने रुग्णालयासाठी ही जागा अपुरी पडत आहे.कारण बाजूने सी आर झेड लाईन आहे.त्यामुळे ५० मीटर अंतर सोडावे लागत आहे.जागा अपुरी पडत आहे.त्यामुळे आम्ही जिल्हा आरोग्य विभाग आणि डेप्युटी आरोग्य विभाग ठाणे येथे प्रस्ताव पाठविला आहे.त्यांच्या कडून काही रिप्लाय आलेला नाही - नरेश पवार उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उरण 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘मेरी माटी मेरा देश' अभियानाचे नवी मुंबईत भव्यतम आयोजन