महापालिका रुग्णालयात रोज २५ ते ३० रुग्ण

डोळ्यांची साथ ; औषधांच्या मागणीत दुपटीने वाढ

वाशी : नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून डोळे येण्याची (कंजंक्टिव्हायटिस) साथ सुरु आहे. त्यामुळे डोळ्यांच्या औषधांची आणि ‘ड्रॉप'ची मागणी दुपटीने वाढली आहे. अचानक मागणी वाढल्याने नवी मुंबई शहरातील औषध विक्रेत्यांना औषध पुरवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

नवी मुंबई शहरात मागील १०-१२ दिवसांपासून डोळे येण्याचे रुग्ण आढळून येत आहेत. नवी मुंबई महापालिका रुग्णालयात रोज २५ ते ३० रुग्ण जरी येत असले तरी खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या शेकडोंनी आहे. डोळ्यांची साथ वाढल्याने डॉक्टर औषध तसेच आय ड्रॉप डोळ्यात टाकण्याचा सल्ला देतात. त्यामुळे एकाच वेळी या औषधांची आणि ‘ड्रॉप'ची अचानक मागणी वाढली आहे. परिणामी बाजारात विविध कंपन्यांच्या ‘आय ड्रॉप'चा सध्या तुटवडा जाणावत आहे. पूर्वीच्या तुलनेत औषधांच्या आणि ‘ड्रॉप'च्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे डोळ्यांपरील औषधांच्या आणि ‘ड्रॉप'चा तुटवडा जाणवत आहे, असे मत घाऊक औषध पुरवठादारांनी व्यक्त केले आहे.
मागील दहा-बारा दिवसांपासून डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे औषधांच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून औषध कंपन्यांकडून डोळ्यांवरील औषधांचा, ‘आय ड्रॉप'चा पुरेसा पुरवठा होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. - राजेश गुप्ता, औषध पुरवठादार - नवी मुंबई. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बोगस कर्मचारी घोटाळ्यात सिडको अधिकारी-कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात