द्रोणागिरी येथे रक्तदान शिबिर व पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

शिवसेना द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

उरण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक ६ ऑगस्ट २०२३रोजी द्रोणागिरी शहरांमध्ये कच्छ युवक संघ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर व पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांना शिवसेना जिल्हाप्रमुख  मनोहर शेठ भोईर, उरण तालुका प्रमुख  संतोष ठाकूर व उरण शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लावून  जगजीवन भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. जगजीवन भोईर यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात  ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केलं व ५२ व्या वाढदिवस ५२ बाटल्यांची भेट देण्यात आली तसेच पावसाळी रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये बामन डोंगरी क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक व चिंचपाडा संघाने द्वितीय क्रमांक पटकावला या स्पर्धेमध्ये सुद्धा बारा संघांनी सहभाग घेतला होता. 

प्रमुख पाहुणे म्हणून गणेश घरत अंतर्गत युनियन चे कार्याध्यक्ष, सागर घरत सरपंच फुन्डे, कुंदनशेठ भोईर उपसरपंच नवीन शेवा, रायगडभूषण किर्तनकार प्रभाकर महाराज तांडेल नवघर विश्वजित घरत अध्यक्ष फुन्डे, शैलेश भोईर शाखाप्रमुख नवीन शेवा, प्रितम म्हात्रे शाखाप्रमुख फुन्डे, नरेंद्र म्हात्रे माजी शाखाप्रमुख फुन्डे, स्वीय सचिव सुशांत म्हात्रे, सम्राट घरत, समन्वयक नितीन ठाकूर विद्याधर तांडेल माजी उपविभाग प्रमुख सेक्टर ४१ सोसायटीचे पदाधिकारी वैशाली सुतार महिला संघटिका नवीन शेवा, मयुरी घरत, वैशाली म्हात्रे, शुभांगी भोईर, मिनल म्हात्रे, सविता सुतार, रंजना घरत, जागृती घरत उपस्थित होते.

कार्यक्रमास किसनशेठ म्हात्रे संघटक प्रमुख व प्रतिक पाटील उपशहरप्रमुख यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास रविंद्र पाटील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय शिंदे सचिव, सोमनाथ भोईर फेरीवाला संघटनेचा अध्यक्ष, रूपेश पाटील विभागप्रमुख द्रोणागिरी नोड, अशोक पाटील, शाखाप्रमुख ४८ अंकुश चव्हाण शाखाप्रमुख सेक्टर ५०, संजय कापसे शाखाप्रमुख सेक्टर ५१, बापू गरूड शाखाप्रमुख सेक्टर ५२, अजय भोसले शाखाप्रमुख ५३, स्वराज तोटे शाखाप्रमुख सेक्टर ३० केतन नाईक सेक्टर ५५, रूपेश पाटील शाखाप्रमुख सेक्टर ४७ ,योगेश भारमल युवाअधिकारी सेक्टर ५२, सागर  खांडेकर सेक्टर, विष्णू जाधव, राजू रेवे, नोळे साहेब, उपशाखाप्रमुख आनंद कोपे, भिवा खांडेकर उपशाखाप्रमुख सेक्टर ५०,भरत काटे उपशाखप्रमुख सेक्टर ५२, सावंत सचिव फेरीवाला संघटना,महिला संघटनेच्या संघटिका सुरेखा भोईर, रविना ठाकूर उपजिल्हा युवती, अंकिता घरत उपतालुका युवती, बेबी ठाकूर उपतालुका, शोभा घेरडे शाखासंघटिका ५० अनिता घरत शाखासंपर्क प्रमुख सेक्टर ५० ,स्वाती चव्हाण, राणी सिंग व्यापारी संघटना,जगदंब ग्रुप (कोल्हापूर) सेक्टर ३० तसेच फेरीवाला संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.कार्यक्रमाचे आयोजन द्रोणागिरी युवा सेना शहराधिकारी करण पाटील, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष कुणाल घरत, योगेश पडते,स्वस्तिक घरत, नवनियुक्त युवा शाखाधिकारी सेक्टर ५४ यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बालके सदृढ रहण्यासाठी पनवेल महापालिका मिशन इंद्रधनुष्य 5.0