‘अपोलो हॉस्पिटल्स'तर्फे दिवंगत अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सत्कार

अपोलो हॉस्पिटल्स येथे ‘द वॉल ऑफ रिमेंबरन्स'चे अनावरण

नवी मुंबई : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने ३ ऑगस्ट भारतीय अवयवदान दिनानिमित्त ज्यांनी शेवटच्या टप्प्यातील अवयव निकामी झालेल्या रुग्णांना नवे जीवन दिले अशा दिवंगत अवयव दात्यांचा सन्मान करण्यासाठी एका अनोख्या ‘द वॉल ऑफ रिमेंबरन्स (स्मरण भिंत)' उभारली आहे. या ‘स्मरण भिंती'चे अनावरण करण्यात आले. तसेच दिवंगत अवयवदात्यांना श्रध्दांजली वाहण्यात येऊन त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी नवी मुंबई महापालिका आयुवत राजेश नार्वेकर, नवी मुंबई पोलीस आयुवत मिलिंद भारंबे, अपोलो हॉस्पिटलचे प्रा.डॅरियस मिर्झा, डॉ.अमोल कुमार पाटील, डॉ.संजीवकुमार जाधव, डॉ. किरण शिंगोटे, डॉ. रवी शंकर, सीईओ संतोष मराठे, दिवंगत अवयवदात्यांचे कुटुंबिय, आदि उपस्थित होते.

दरम्यान, अवयवदान दिनानिमित्त मी अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निःस्वार्थ कार्याला प्रणाम करु इच्छितो. सदर स्मरण भिंतीमुळे भारतात अवयवदानाला चालना मिळेल, यात शंका नाही. अवयवदान जीवनाची अनमोल देणगी आहे. निराशेचे मळभ झटकून आशेचे किरण निर्माण करणारी आहे, असे महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यावेळी म्हणाले.

तर नवी मुंबई पोलीस अवयव प्रत्यारोपण आणि जीवन वाचवण्यासाठी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांना मदत करते. अवयवाची ने-आण होताना आम्ही ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात मदत केली आहे, जेणेकरुन काढलेले अवयव लवकरात लवकर प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचतील. आमच्या प्रयत्नांमुळे प्रत्यारोपण करणाऱ्या शल्यचिकित्सकांना लोकांचे जीव वाचवण्यास मदत झाली आहे आणि रुग्णांच्या कुटुंबियांच्या मनात आशा जागृत झाली आहे. त्यामुळे ‘द वॉल ऑफ रिमेंबरन्स'मुळे लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांनी सांगितले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उद्‌वाहक बंद ; दिव्यांग,ज्येष्ठ नागरीकांना नाहक त्रास?