खाडीवरची माडी कादंबरीवरील चर्चासत्रात मान्यवर सहभागी होणार

५ ऑगस्ट रोजी खाडीवरची माडी - एक प्रेम कथा कादंबरीवर दुसरे चर्चासत्र

नवी मुंबई : ‘खाडीवरची माडी' या १८ मे २०२३ रोजी प्रकाशित झालेल्या साहित्यिक गज आनन लिखित कादंबरीवर ५ ऑगस्ट रोजी  सायंकाळी ५.३०वा. करावे गाव येथील ज्ञानदीप विद्यालयात दुसरे चर्चासत्र आयोजन करण्यात आले आहे. पहिले चर्चासत्र १० जून रोजी के.गो. लिमये वाचनालय पनवेल येथे पार पडले असता त्यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले होते.

करावे येथील दुसऱ्या चर्चासत्रात वक्ते म्हणून साहित्यिक प्रमोद कर्नाड, रायगड भूषण प्रा. एल.बी. पाटील, डॉ. अविनाश पाटील, व्याख्याते योगेश लोहकरे, दिग्दर्शक रवी वाडकर, रत्नाकर तांडेल, कवी घनश्याम परकाळे, कामगार नेते निलेश तांडेल, पत्रकार सुधाकर लाड सहभागी होणार आहेत. या चर्चासत्र प्रसंगी ॲड.पी.सी.पाटील, ज्ञानदीप हायस्कूल, करावेचे अध्यक्ष रविंद्र नाईक, माजी नगरसेवक दशरथ भगत, विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, कुसुमाग्रज वाचनालयाचे ललित पाठक, माजी प्राचार्य प्रा. अजित मगदूम,  समीर बागवान आदि मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक  ‘दै. आपलं नवे शहर' आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी सुचित्रा कुंचुमवार सांभाळणार आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दक्षिण नवी मुंबईतील सिडकोच्या भूखंडांना वाढती मागणी