शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
शहरातील १२४ पीयूसी केंद्राची तपासणी
अवैधरित्या पीयूसी देणाऱ्या ५ केंद्रांवर आरटीओची कारवाई
नवी मुंबई : रस्त्यावर धावणाऱ्या सर्वच वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. मात्र बऱ्याच वेळा पीयूसी केंद्र.विना तपासणी अवैधरित्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देवून मोकळे होतात. आणि अशा केंद्राची तपासणी करण्याचे आदेश परिवहन खात्याने दीले होते.त्यानुसार वाशी आरटीओ कडून शहरातील १२४ पियूसी केंद्राची तपासणी करून अनधिकृतपणे पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या केंद्रावर कारवाई केली आहे. यामध्ये पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.
वाहनधारकाने कायद्यानुसार पीयूसी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी पीयूसी प्रमाण पत्र असणे गरजेचे आहे. पीयूसी म्हणजे वाहनामुळे प्रदूषण होत नाही, याची शास्वती देणारे प्रमाणपत्र. यामध्ये वाहनांमधून निघणाऱ्या कार्बन मोनॉक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड यांसारख्या वेगवेगळ्या वायूंची चाचणी केली जाते. चाचणीनंतर वाहनास पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते. परिवहन कार्यालयाने आरटीओला पीयूसी केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई आरटीओ विभागाने मागील चार ते पाच दिवसात शहरातील तब्बल १२४ पीयूसी केंद्राची तपासणी केली. यामध्ये ३ केंद्रे बंद आढळली ती बंद करण्यात आली. मात्र पाच केंद्रावर अनधिकृतपणे प्रमाणपत्र दिले जात असल्याचे आढळले. आरटीओने यातील काही जणांवर परवाना नसल्याने तर काही जणांनी प्रत्यक्ष वाहनाची पडताळणी न करताच प्रमाणपत्र दिल्याचे निदर्शनास आले , त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा परवाना निलंबित केला आहे.
परिवहन कार्यालयाला शहरातील पीयूसी केंद्राची तपासणी करण्याचे आदेश होते. त्या अनुषंगाने शहरातील १२४ केंद्राची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये पाच जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचा परवाना निलंबित केला आहे. - हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, आरटीओ वाशी.