धुतूम गावातील भुयारी रस्ता बनला धोकादायक

धुतूम गावातील अंडर पास ( भुयारी) रस्ता बनला धोकादायक

उरण : धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील अंडर पास ( भुयारी ) रस्त्यावर सोमवारी ( दि३१) रात्री ठिक ८-३०च्या सुमारास मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे.सदर अपघातात फोर व्हीलर गाडीचे नुकसान झाले असून वाहन चालक थोडक्यात बचावला आहे.

जेएनपीए बंदर प्रशासनाने एन एच फोर बीच्या माध्यमातून जेएनपीए बंदर ते पलस्पे फाटा या महामार्गाची उभारणी केली आहे.या महामार्गावरील धुतूम गावातील नागरिकांना, प्रवासी वाहनांना सुखकर प्रवास होण्यासाठी एन एच फोर बीने धुतूम गावाजवळ अंडर पास ( भुयारी) रस्त्याची उभारणी केली आहे.परंतु सदर अंडर पास ( भुयारी) रस्ता हा प्रवाशी वाहतूकीसाठी असताना या रस्त्यावरून रात्री अपरात्री सातत्याने अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे अपघाताची संख्या बळावली आहे.त्यातच सोमवारी ( दि३१) रात्री ८-३० च्या सुमारास कंटेनर फोर व्हीलर गाडीवर पलटी होण्याची घटना घडली आहे.सुदैवानी सदर अपघातात फोर व्हीलर गाडीचे नुकसान झाले असून चालक थोडक्यात बचावला आहे.

एन एच फोर बी ने धुतूम गावातील रहिवाशांच्या रहदारीसाठी जो अंडर पास ( भुयारी) मार्ग बनविला आहे. तो चुकीचा असून सदर अंडर पास( भुयारी) मार्ग हा पुर्वापार नागरिकांच्या रहदारीच्या रस्त्यावर बनविण्याची धुतूम ग्रामपंचायतीची मागणी असून तशा प्रकारचे पत्र एन एच फोर बी व संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहे.तसेच रहिवाशांच्या सर्व्हिस रस्त्यावर अवजड वाहनाची रहदारी तसेच बेकायदा पार्किंग केली जाते त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे - सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर सरपंच धुतूम ग्रामपंचायत 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एमआयडीसी प्रकल्पग्रस्त ६२ वर्षे पुनर्वसनापासून वंचित!