ठाणे शहरातील स्थितीचा आढावा

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षास महापालिका आयुवत अभिजीत बांगर यांची भेट

ठाणे : ठाणे शहरात पावसाची संततधार सुरु राहिल्याने ठाणे शहरातील सखल भागात पाणी ठिकठिकाणी पाणी साचले असून नागरिकांच्या तक्रारी ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी करुन ठाणे शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.  ठाणे शहरातील सर्व यंत्रणा सतर्क रहावी, अशी सूचना यावेळी महापालिका आयुक्तांनी केली.

महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात ठाणे शहरात पाणी साचणे, झाडांच्या फांद्या उन्मळणे, वाहतूक वळविल्याच्या तक्रारींचा आढावा घेऊन प्रलंबित तक्रारी विनाविलंब निकाली काढण्याची सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिली. तसेच प्रादेशिक आपत्ती  व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त तक्रारींची नोंद झाल्यानंतर त्या तक्रारींचे निराकरण होईपर्यत तक्रारीचा सतत आढावा घेतला जावा अशीही सूचना महापालिका आयुक्तांनी दिली.

ठाणे शहरात दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद घेत असतानाच ठाणे शहरातील प्रभागनिहाय किती पाऊस झाला याचीही आकडेवारी उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापनाला देतानाच आपत्ती व्यवस्थापन कक्ष, एनडीआरएफची टीम व टीडीआरएफची टिम यांनी परस्पर समन्वय ठेवून आवश्यक त्या ठिकाणी टिम पाठविण्याची सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली.

प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण होईपर्यत सतत तक्रारीचा आढावा घेतला जावा. तसेच तीन शिपटमध्ये काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपली ड्यूटी संपताना तक्रारीच्या निराकरणाबाबत एकमेकांशी समन्वय साधावा. याशिवाय प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कामकाज लवकरात लवकर डिजीटलायजेशन पध्दतीने सुरु करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, उपायुवत जी. जी. गोदेपुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळी परिस्थिती, तत्पर मदत कार्यवाहीवर आयुवतांचा विशेष वॉच