मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव

कार्यक्रमात ‘शून्य कचरा उपक्रम'ची संकल्पना


नवी मुंबई : स्वच्छ आणि सुंदर शहर अशा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई शहराच्या स्वच्छता कार्यात अगदी सुरुवातीपासूनच महत्वाचे योगदान देणारे नवी मुंबई महापालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे येत्या नियत वयोमानानुसार येत्या ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने २५ जुलै रोजी सीबीडी मधील वारकरी भवन येथे सेवानिवृत्त शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सदर कार्यक्रम ‘शून्य कचरा उपक्रम (झिरो वेस्ट इवेन्ट)' या संकल्पनेनुसार साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वापरले गेलेले सर्व साहित्य ‘थ्री आर' नुसार होते.

याप्रसंगी महापालिकेच्या अतिरिवत आयुवत सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उप मुख्य स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, स्वच्छता अधिकारी सुर्यकांत म्हात्रे, राजेंद्र इंगळे, सुधीर पोटफोडे, विजय पडघन, सुभाष म्हसे, सतिश सनदी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आपण सेवा कालावधीत स्वच्छता विभागाप्रमाणेच काही काळ नेरुळ विभाग अधिकारी पदाचीही जबाबदारी निभावली. मात्र, कोणत्याही पदावर कामाला महत्त्व देऊन जे जे काम सोपविण्यात आले, ते प्रामाणिकपणे पार पडण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबई महापालिका आहे म्हणून आपण आहोत हे न विसरता आपल्यामधील सर्वोत्तम देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहन मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांनी सहकारी, अधिकारी-कर्मचारी यांना सत्काराला उत्तर देताना केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 शेती आणि शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी पंतप्रधान किसान सुविधा केंद्र