मणिपूर घटनेतील सर्व दोषी व्यक्तींवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी

 मणिपूर मधील हिंसाचाराच्या निषेधासाठी २२ संस्था-संघटना रस्त्यावर

नवी मुंबई : मणिपूर मध्ये सुरु असलेल्या हिंसाचारात दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. सदर घटनेचा नवी मुंबईतील स्वंयसेवी संस्था आणि संघटनांकडून देखील २५ जुलै रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करण्यात आला. यात नवी मुंबईतील विविध २२ संस्था आणि संघटनेतील महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.  

मणिपूर येथील बलात्कार प्रकरणाचा नवी मुंबईतील स्वंयसेवी संस्था आणि संघटनांनी निषेध केला. यात स्त्री मुक्ती संघटना, महाराष्ट्र महिला परिषद, चेतना फाऊंडेशन, अलर्ट इंडिया, अन्वय प्रतिष्ठान, अन्नपूर्णा परिवार, नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, म्युझिक ॲन्ड ड्रामा सर्कल, टाऊन लायब्ररी, परिसर सखी विकास संस्था, वी नीड यु, महा-अनिस, समता महिला मंडळ, लाईफ अनंता, महिला राजसत्ता आंदोलन, मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन, घर हक्क संघर्ष समिती, कामगार एकता युनियन, महाराष्ट्र महिला विकास मंडळ, रमाईच्या लेकी महिला वकास मंडळ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महिला अत्याचार विरोधी मंच-पेण, आदि संस्था-संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या निषेध आंदोलनादरम्यान मणिपूर घटनेतील सर्व दोषी व्यक्तींवर त्वरित कठोर कारवाई करण्याची तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व त्या उपायोजना तत्काळ करण्याची मागणी या सर्व संघटनांकडून करण्यात आली. या निषेध आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अजित मगदूम, वृषाली मगदुम, कविता नायर, स्मिता गांधी, भीम रासकर, हिरामण पगारे, आदिंनी केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीताफळप्रतिकिलो १३०-१५० रुपयांनी विक्री