चार महिन्यात १५० कोटीहून अधिक मालमत्ता कर वसुली

पनवेल महापालिका तर्फे मालमत्ता कर विशेष पुनःनिरीक्षण मोहिम

पनवेल : पनवेल महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत २४ जुलै ते २८ जुलै २०२३ या कालावधीत पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी १०ः३० ते दुपारी १ः३० या वेळेत कर निर्धारण दुरुस्ती मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण पूर्ण झालेल्या मालमत्तांची कर आकारणी नोंदवहीची प्रारुप यादी स्थानिक वर्तमानपत्र, प्रभाग कार्यालय तसेच महापालिकेच्या ज्ीहनत्स्म्.दीु या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रसिध्द करण्यात आली होती. तसेच वैयक्तिक नोटीस बजावून विहीत मुदतीत हरकत घेण्याची संधी मालमत्ता धारकांना देण्यात आली होती. परंतु, काही मालमत्ता धारकांनी दिलेल्या विहीत मुदतीत हरकत घेतलेली नाही. दिलेल्या मुदतीत हरकत न घेतलेल्या मालमत्ता धारकांना नैसर्गिक न्याय मिळावा या तत्वाने आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रकरण ८ अंतर्गत कराधान नियमानुसार कर आकारणीत दुरुस्ती, फेरफार करण्याची तरतुद असल्याने मालमत्ता धारकांना हरकत अर्ज करण्यासाठीची आणखी एक संधी महापालिका द्वारे देण्यात येत आहे. यामध्ये मालमत्तेचे बाह्य स्वरुपाच्या मोजमापामध्ये काही त्रुटी राहिली असल्यास, वापरामधील तफावत असल्यास,स्वमालकी असताना भाडेतत्वावर झालेली कर आकारणी झाली असल्यास मालमत्ता धारकांनी हरकती अर्ज सादर करावेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्तांना कलम १२९अ नुसार कर आकारणी करण्यात येत आहे. मालमत्ताधारकास या संदर्भात काही हरकत असल्यास त्यांनी आपले हरकती अर्ज करावेत. तसेच पूर्णत्व प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र किंवा वापर दिनांकापासुन कर आकारणी, अनधिकृत शास्ती आकारणी बाबत, प्राथमिक कर आकारणी मध्ये नाव नोंद करणे, त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबात मालमत्ताधारकांच्या काही हरकती असल्यास त्यांनी आपला हरकत अर्ज महापालिकेकडे करायचा आहे. ग्रामपंचायत कालीन भरणा केलेल्या पावत्यांचे समायोजन करणे, कर निर्धारणामध्ये किरकोळ दुरुस्ती, प्रथम कर आकारणीमध्ये दुरुस्ती असेल, कर आकारणी न झालेल्या मालमत्तांना कर आकारणी बाबतीत मालमत्ताधारकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी आपला हरकत अर्ज या मोहिमेंतर्गत सादर करावा. मालमत्ताधारक आजी, माजी सैनिक असल्यास मालमत्ता कराच्या बिलात सवलत द्यायची राहून गेली असल्यास त्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

मालमत्तताधारकांनी आपला आक्षेप अर्ज आणि आपल्या कागदपत्रासहित२४ जुलै ते २८ जुलै २०२३ पर्यंत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे सकाळी १०ः३० ते ०१ः३० या वेळेत सादर करावेत. या ठिकाणी मालमत्ता कर विशेष पुनः निरीक्षण मोहिमेंतर्गत खास चार पथकांचे नियोजन करण्यात आले आहे.या पथकातील कर्मचारी मालमत्ताधारकांची हरकत लक्षात घेऊन तत्काळ बिलामध्ये दुरुस्ती करुन देणार आहेत.

महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही मालमत्ता कर वसुलीला स्थगिती दिली नाही.त्यामुळे महापालिका मालमत्ता कराच्या वसुलीवर भर देत आहे. एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत महापालिकेने १५०  कोटीहून अधिक रवकम मालमत्ता कर वसुली केली आहे.नागरिकांनी आपल्या मालमत्ता बिलासंर्भात असणाऱ्या हरकती विशेष पुनः निरीक्षण मोहिमेंतर्गत सादर करुन, त्यांचे निराकरण करावे, असे आवाहनही पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती यावरील उपाययोजना याविषयीची आढावा बैठक संपन्न