महापालिका क्षेत्रात ‘स्वनिधी से समृद्धी’ कार्यक्रम

आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समितीच्या सदस्यांची बैठक

पनवेल  : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री चलविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतंर्गत "स्वनिधी से समृद्धी "कार्यक्रम राज्यात राबविणेत येत आहे. या योजने अंतर्गत पनवेल महानगरपालिकेचे समावेशन तृतीय टप्प्यामध्ये झालेले आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचे लाभार्थी व त्यांचे कुटुंबियांचे समावेशन या कार्यक्रमांतर्गत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची  प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता केंद्र शासनाच्या सुचनेनुसार पनवेल महानगरपालिकेने सनियंत्रण समिती तयार करण्यात आली आहे. या समितीची बैठक दिनांक 18 जुलै रोजी मा. आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली मुख्यालयात घेण्यात आली.

या बैठकीमध्ये ‘स्वनिधी मे समृद्धी’ कार्यक्रमामध्ये सर्वेक्षण केलल्या लाभार्थ्यांना संबंधित विभाजन लाभ देण्यासंदर्भाबाबत मा. आयुक्तांनी  सूचना दिल्या. तसेच ज्या लाभार्थ्यांची कर्जे पीएमस्वनिधी अंतर्गत वितरीत  झालेले  नाही अशा लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज वितरीत करून त्यांच्या कुटुंबाला सुध्दा या योजनेचा लाभ देण्याबाबत सांगितले.

केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार  एकुण आठ योजना पथविक्रेत्यांस अभिसरण  करण्यासाठी निश्चित केल्या आहेत. यामध्ये वित्तविभागाच्या माध्यमातून  प्रधान मंत्री ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधान मंत्री जन-धन योजना, कामगार विभागाच्या माध्यमातून इमारत व बांधकाम अंतर्गत नोंदणीकरण, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, अन्न नागरी पुरवठा विभागांतर्गत एक राष्ट्र एक राशन कार्ड, आरोग्य विभागांतर्गत जननी सुरक्षा योजना, महिला व बाल कल्याण विभागांतर्गत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना इत्यादींचा समावेश आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डाऊरनगर येथे घराजवळ दरड कोसळली