मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीहरी पवळे यांचा सन्मान

२५ वर्षात  केलेल्या १० हजारहुन अधिक नाटक फलक लेखनाचा गौरव

नवी मुंबई : गेली २५ वर्षे १० हजारहुन अधिक नाटक फलन लेखन करणारे नवी मुंबईमधील प्रसिध्द रंगकर्मी श्रीहरी पवळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्ड'ने वाशीत १५ जुलै रोजी सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे श्रीहरी पवळे यांचा त्यांच्या वाढदिवशी आणि ज्या नाट्यगृहात २५ वर्षे नाटक फलक लेखन केले आहे, याबद्दल ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने सन्मान  केला, त्याच विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या व्यासपीठावर त्यांना सन्मानित करण्यात आले.

श्रीहरी पवळे सन १९९६ पासून २७ वर्षे कोरोनाचा दोन वर्षांचा कालखंड वगळता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नाटक, फलक लेखन करीत आहेत. यादरम्यान त्यांनी १० हजार पेक्षा जास्त नाटक फलक लेखन केले आहे. श्रीहरी पवळे यांनी केले आहे. याशिवाय पवळे यांचे शालेय फलक लेखन देखील खूप प्रसिध्द आहेत. १५ जुलै रोजी शिवसेना नवी मुंबई आयोजित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर सत्कार सोहळ्यावेळी  मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते श्रीहरी पवळे यांना ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्ड'कडून मिळालेल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, सदर पुरस्काराबद्दल महाराष्ट्रातून अनेक मान्यवरांकडून श्रीहरी पवळे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवघ्या तीन महिन्यात १५० कोटीची वसुली