वेतनासाठी प्रतिक्षा करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांनी काढला पनवेल महापालिकेवर मोर्चा

सिडको आणि पनवेल महानगरपालिकेच्या टोलवाटोलवीने सफाई कामगारांचे वेतनाविना हाल

पनवेल : पनवेल महानगर पालिकेच्या उद्यान विभागातील सफाई कामगारांना पाच महिने होत आले तरी पगार देण्यात टाळाटाळ करण्यात येत असून या प्रकरणी पाच बैठका उपकामगार आयुक्त आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यासोबत होऊनही गरीब कामगारांकडे कुणी लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ १४ जुलै रोजी हिंद मजदूर किसान पंचायतीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.

पालिका आयुक्त व्यस्त असल्याने उपायुक्त (उद्यान) कैलास गावडे यांच्या दालनात मोच्यानंतर बैठक झाली. १० मार्च २०२३ रोजी मुख्यमंत्री यांच्या समक्ष सिडकोकडील सर्व नागरी सेवांच्या हस्तांतरणाचा करार पालिका आयुक्त आणि सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्या दरम्यान होउनही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करीत करण्यात येत असून केवळ तांत्रिक मुद्दे चर्चिले जात असल्याचे युनियन म्हणणे आहे. पालिका आयुक्तांनी स्वतः  सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवून दि.१८ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ .३० वा. उच्चस्तरीय बैठक आयोजित केल्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना देण्यात आले. सदर मोर्चासाठी महिला पुरुष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्यामध्ये तुटवडा