उरण येथे 

सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे च्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

उरण : सामाजिक कार्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन समीर म्हात्रे यांनी स्थापन केलेल्या सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व मोफत शिकवणी वर्ग, रक्तदान शिबीर, आदिवासी बांधवांना जीवनोपयोगी साहित्य वाटप, सामाजिक संस्थांना पुरस्कार असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.

 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकोबा रायांच्या उक्ती प्रमाणे वृक्षलागवडीचे महत्व लक्षात घेऊन संस्थेमार्फत मगबाची वाडी, रानसई उरण येथे  "वृक्षारोपण कार्यक्रमा" अंतर्गत २५ झाडांची लागवड करण्यात आली व भविष्यात या झाडांचे संगोपन देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शितल पाटील फॉरेस्ट अधिकारी उरण, प्रितम टकले, मुख्याध्यापक, पी.पी.एम्. इंग्लिश मीडियम स्कूल, वेश्वी,महेश पाटील गाव अध्यक्ष कळंबुसरे यांची उपस्थिती लाभली. तसेच संस्थेचे सचिव संजय म्हात्रे, कार्याध्यक्ष पद्माकर पाटील, सदस्य शैलेश भोजानी, प्रणित राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या स्तुत्य अशा उपक्रमासाठी कु.प्रांजल सचिन पाटील,कळंबुसरे यांनी ५ झाडे ,कु.प्रियांश प्रितम टकले गावठाण यांनी ५ झाडे दान स्वरूपात भेट दिली. त्या बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर म्हात्रे यांनी त्यांचे संस्थेच्या वतीने विशेष आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिपक फर्टिलायझर्स ॲड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन व ईशान्य फाऊंडेशन यांच्या वतीने महानगरपालिकेच्या माध्यमातून क्षयरूग्णांना पोषण आहार वाटप