दिपक फर्टिलायझर्स ॲड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन व ईशान्य फाऊंडेशन यांच्या वतीने महानगरपालिकेच्या माध्यमातून क्षयरूग्णांना पोषण आहार वाटप

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून  पोषण आहार किटचे वाटप


पनवेल : सर्वांनी परिपूर्ण आहार घ्यायला हवा, अनेक लोक व्यसनामध्ये पैसा वाया घालवतात तेच पैसे आपल्याला परिपूर्ण आहार घेण्यासाठी पुरेसे ठरत असतात. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा, महानगरपालिका दिपक फर्टिलायझर्स ॲड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन व ईशान्य फाऊंडेशनचे आभारी आहे. असे प्रतिपादन आयुक्त  गणेश देशमुख यांनी केले.

प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज दिनांक 12 जुलै रोजी कळंबोली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी क्षयरूग्णांना दिपक फर्टिलायझर्स ॲड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन व ईशान्य फाऊंडेशन यांच्यावतीने महापालिकेच्या माध्यमातून  पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी दिपक फर्टिलायझर्स प्रकल्प प्रमुख दिनेशप्रताप सिंह, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी,  दिपक फर्टिलायझर्सचे वरिष्ठ महाव्यवस्थापक किष्णात बेलेकर, सीएसआर फंडाचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप काकडे, प्रकल्प समन्वयक योगेश पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल पाटील,  परिचारिका,कर्मचारी उपस्थित होते.

 दिपक फर्टिलायझर्स प्रकल्प प्रमुख दिनेशप्रताप सिंह म्हणाले , सन 2025 पर्यंत संपूर्ण भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी आपण कटिबध्द होणे गरजेचे आहे. क्षयरोग मुक्त भारत हे आपलं ध्येय आहे, आपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न् करायला हवेत.

या कार्यक्रमांमध्ये  150 क्षयरूग्णांना गहू ,तांदूळ, डाळ, तेल, दूध पावडर या पोषण आहाराच्या किटचे वाटप करण्यात आले. उद्या दिनांक 13 जुलै रोजी दिपक फर्टिलायझर्स ॲड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन व ईशान्य फाऊंडेशन यांच्यावतीने महापालिकेच्या माध्यमातून खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 50 क्षयरूग्णांना धान्य किटचे वाटप करण्यात येणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रस्ते सुरक्षितता उपाययोजनांचा महापालिका आयुवतांकडून आढावा