५०० अवयव प्रत्यारोपीत करणारे अपोलो एकमेव रुग्णालय

‘अपोलो हॉस्पिटल्स'तर्फे ५३५ सॉलिड अवयव प्रत्यारोपण

नवी मुंबई : ‘अपोलो हॉस्पिटल्स'ने ५३५ सॉलिड अवयव प्रत्यारोपण पूर्ण करुन एक इतिहास घडवला आहे. अपोलो हॉस्पिटल्स येथील अपोलो इन्स्टिट्युट ऑफ ट्रान्सप्लांटमधील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक अशा अत्याधुनिक बहु-अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमामुळे सदरचे यश प्राप्त झाले आहे. २०१७ पासून अपोलो हॉस्पिटल्सने ३२७ मूत्रपिंड प्रत्यारोपण, २०० यकृत प्रत्यारोपण आणि ८ हृदय प्रत्यारोपण केले आहेत.

भारतासारख्या देशात अवयव दानाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून अवयव प्रत्यारोपण तसेच विशेषतः मृत दात्यांच्या अवयव प्रत्यारोपणाची खूप आवश्यकता आहे. ‘अपोलो'ने ५०० प्रत्यारोपणाचा मोठा पल्ला गाठल्यामुळे भारतात दरवर्षी ५ लाखाहून अधिक लोकांना अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. तसेच २ लाख लोकांना यकृत प्रत्यारोपणाची आणि सुमारे दिड लाख लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. सदरची वस्तुथिती देखील समोर आली आहे. परंतु, अवयवांच्या कमतरतेमुळे आणि मर्यादित प्रत्यारोपण सेवांमुळे केवळ ५ % लोकांपर्यंत पोहोचता येते आणि हजारो लोक जीवनरक्षक प्रत्यारोपणाची प्रतिक्षा करत आपला जीव गमावतात, असे ‘अपोलो हॉस्पिटल्स'तर्फे पत्रकारांशी संवाद साधताना सांगण्यात आले.

‘अपोलो'तर्फे ५३५ प्रत्यारोपण (आंतरराष्ट्रीय स्तरावरील १८ मूत्रपिंड प्रत्यारोपण, १२ यकृत प्रत्यारोपण) म्हणजे केवळ एक संख्या नाही; तर कुटुंबांना पुन्हा एकत्र येण्याचा आनंद आणि रुग्णांना आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळाल्याचे द्योतक आहे. ज्यांचे जीवन प्रत्यारोपणाद्वारे वाचवले गेले किंवा ज्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आली अशा प्रत्येक रुग्णासाठी अपोलोचा प्रत्यारोपण कार्यक्रम जणू आशेचा किरण आहे, असे ‘अपोलो हॉस्पिटल्स'चे सीईओ संतोष मराठे यांनी सांगितले.

शेवटच्या टप्प्यातील अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपण जीवन वाचवणारी प्रक्रिया असून यामुळे जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारते. ‘अपोलो'च्या यकृत प्रत्यारोपण विभागाने नेहमी उत्कृष्ट परिणाम देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आमच्या पट्ट्याखाली २०० यकृत प्रत्यारोपण करुन त्यापैकी ६५ मुलांमध्ये करण्यात आल्या आहेत, असे ‘हॉस्पिटल'चे  यकृत-एचपीबी पोग्राम मुख्य सल्लागार डॉ. प्रा. डॅरियस मिर्झा म्हणाले.

अपोलो येथील आमचा मूत्रपिंड प्रत्यारोपण कार्यक्रम मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारा एक आधारस्तंभ ठरला आहे. कल्पकता, समर्पण आणि रुग्णाची अतुलनीय काळजी याद्वारे आम्ही ३०० हून अधिक मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण केले आहेत, अशी माहिती ‘अपोलो हॉस्पिटल्स'चे न्यूरोलॉजी, युरो-ऑन्कोलॉजी, मूत्रपिंड प्रत्यारोपण-रोबोटिक शस्त्रक्रिया वरिष्ठ सल्लागार डॉ. अमोलवुÀमार पाटील यांनी दिली.

हृदय प्रत्यारोपण एक नाजूक वैद्यकीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अचूकता, कौशल्य आणि कारुण्य भाव आवश्यक आहे. अपोलो येथे आम्ही हृदयविकाराच्या रुग्णांना आशा प्रदान करतो आणि नवी सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन देतो. आम्ही करत असलेले प्रत्येक हृदय प्रत्यारोपण समर्पित भावनेचा आणि वैद्यकीय उत्कृष्टतेच्या अथक प्रयत्नांचा जणू दाखला आहे, असे हॉस्पिटलचे सीव्हीटीएस, हृदय-फुपफुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सल्लागार डॉ. संजीव जाधव म्हणाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिका असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविणार