पनवेल महापालिका असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविणार

पनवेल पालिकेच्यावतीने नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्यावतीने असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे (एनसीडी)प्रशिक्षण एनसीडीचे राज्यस्तरीय सल्लागार डॉ. अमर खिराडे यांनी आज मुख्यालयात सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांना व परिचारिकांना दिले

यावेळी मुख्य आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शासकीय सामान्य रुग्णालय ठाणे पर्यवेक्षक सुमित गायकवाड, सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, मुख्यालय वैद्यकिय अधिकारी, एएनएम उपस्थित हाते.

बदलत्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य रोग (NCD) जसे की कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग,तोंडाचा कर्करोग) , उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, श्वासोच्छवासाचे दिर्घ आजार, मधुमेह अशा रोगांमध्ये वाढ होऊ लागली आहे. हे असंसर्गजन्य रोग रोखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (NPCDCS) सुरू करण्यात आला आहे. ज्यामध्ये पायाभूत सुविधा मजबूत करणे, मानव संसाधन विकास, आरोग्यास प्रोत्साहन, लवकर निदान, कार्यक्रम व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावरती एनसीडी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्यावतीने नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले.

आशा व एएनएम असंसर्गजन्यरोग तसेच असंसर्गजन्य रोगांबाबत महापालिका क्षेत्रात घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करणार आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचा-यांना आपल्या आरोग्याबाबत माहिती सांगून सहकार्य करावे. सर्वेक्षणानंतर तीस वर्षावरील नागरिकांना नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये आपल्या आरोग्य समस्यांसाठी  तसेच असंसर्गजन्य रोगांवरती मोफत औषधोपचार व सल्ला मिळणार आहे.– डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

    वाहतुकीला अधिक शिस्त लावण्यासाठी आणखी उपाय करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश