पावसाळी कालावधीत रस्ते दुरुस्तीसाठी नवी मुंबई पालिका विशेष दक्ष

रस्ते दुरुस्तीची कार्यवाही जलद करण्यावर भर - शहर अभियंता संजय देसाई

नवी मुंबई : पावसाळी कालावधीपूर्वी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या तीन बैठका घेऊन पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे तसेच पावसाळी कालावधीत आवश्यक दक्षता घेण्याचे आणि परस्पर समन्वय राखण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आयुक्त नार्वेकर यांनी भर पावसात नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा पाहणी दौराही केला होता. या दौऱ्यामध्ये आयुक्तांनी काही ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांची काही कामे त्वरित थांबविण्याचे आणि सदर रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागास दिले होते. त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीबाबतही तत्पर कार्यवाहीसाठी निर्देशित केले होते.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत रहावेत याकरिता महापालिका आधीपासूनच दक्षतेने कार्यवाही करीत असून रस्ते दुरुस्तीचे वार्षिक देखभाल-दुरुस्ती कंत्राट करण्यात आले असून ते नियमितपणे सुरू आहे. त्यांच्यामार्फत रस्ते दुरुस्तीवर विशेष लक्ष दिले जात असून याकरिता विभागनिहाय ८ तसेच एमआयडीसी क्षेत्राकरिता २ अशा एकूण १० कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत नियमितपणे रस्ते पाहणी करून त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिकेच्या नागरिक तक्रार निवारण प्रणालीवर (झ्ल्ंत्ग्म् उीगन्ीहम एब्ेूास्) तसेच विविध माध्यमांद्वारे प्राप्त होणाऱ्या रस्त्याबाबतच्या तक्रारींवर त्वरित दुरुस्ती कार्यवाही करण्यात येत आहे. यानंतर कंत्राटदारांमार्फत ४८ तासात दुरुस्ती कार्यवाही करण्यात न आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

पावसाळी कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेने विभागवार रस्ता दुरुस्ती पथके तयार केली असून पावसाळ्याच्या अनुषंगाने कोल्ड मिक्सड अस्फाल्टचा रस्ते दुरुस्तीसाठी वापर करण्यात येत आहे.

दरम्यान, नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने भरतीच्या कालावधीत अतिवृष्टी असल्यास शहरातील काही सखल भागात पाणी साचून राहते. याबाबत दक्षता बाळगत महापालिका जलद पाणी निचरा होण्यासाठी पाणी उपसा पंप आणि इतर अनुषांगिक व्यवस्था करीत असून सखल भागात पाणी साचून राहिल्याने तेथील रस्त्यांच्या पृष्ठभागाचीही काही प्रमाणात हानी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने नागरिकांची कोणतीही गेरसोय होऊ नये याबाबत महापालिका दक्ष असून रस्ते दुरुस्तीची कार्यवाही जलद करण्यावर भर देत आहे, असे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेने रस्त्यांच्या तक्रारीबाबत ८४२४९४८८८८ असा व्हॉटस्‌ॲप क्रमांक नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिलेला असून आपत्ती निवारण कक्षाचे टोल फ्री क्रमांक १८००२२२३०९/१० यावर तसेच महापालिकेच्या तक्रार निवारण प्रणालीवरही (झ्ल्ंत्ग्म् उीगन्ीहम एब्ेूास्) नागरिक रस्त्यांविषयीच्या तक्रारी आणि सूचना दाखल करु शकतात.

पावसाळी कालावधीत रस्ते सुव्यवस्थित राहण्याबाबत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार अभियांत्रिकी विभागामार्फत विशेष दक्षता राखणेबाबत आठही विभागांचे कार्यकारी अभियंता आणि सर्व अभियंतावर्गास तसेच कंत्राटदारांना काटेकोर सूचना देण्यात आली आहे. -संजय देसाई, शहर अभियंता-नवी मुंबई महापालिका.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

'सिडको'चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे