50 वर्षांवरील ज्येष्ठांना दिलासा

निराधार व श्रावणबाळ निवृत्ती योजनेसाठी 5 वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार

नवी मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील 50 वर्षावरील जेष्ठ, वृद्ध नागरिकांना आता पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या 50 वर्षावरील ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांची उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी दरवर्षी करावी लागणारी पायपीट थांबणार आहे.  

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालवधीत उत्पन्नचा दाखला घेण्याची तरतूद होती. मात्र 50 वर्षावरील जेष्ठ, वृद्ध नागरिकांचे यासंदर्भातील अडचण लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाने दिलासा दिला आहे. ज्या लाभार्थ्यांचे वय 50 पेक्षा अधिक आहे त्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर न करता पाच वर्षातून एकदाच दाखला घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 50 वर्षावरील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यागातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स. कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत  चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी 35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नांव असलेल्या व 21 हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यास अर्थसहाय्य देण्यात येते.-  सचिव सुमंत भांगे (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य)  


संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेअंतर्गत 50 वर्षावरील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्न दाखला मिळवताना अडचणी येत असल्याने त्याबाबत दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार उत्पन्न दाखल्याचा अटींमध्ये बदल करण्यात आला असून आता ज्यांचे वय 50 पेक्षा अधिक आहे अशाच लाभार्थ्यांना 5 वर्षामध्ये एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

के व्हिला येथील पूल वाहतुकीसाठी खुला