पनवेल महानगरपालिकेने ३ महिन्यांत १३५ कोटी
मालमत्ता कर जमवून केला वसुलीचा उच्चांक
पनवेलः पनवेल महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या सुरूवातीच्या तीन महिन्यात मालमत्ता करात १३५ कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. मालमत्ता कर विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ३० जूनपर्यंत ४६ हजार १५४ मालमत्ता धारकांनी अवघ्या तीन महिन्यात १३५ कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाद्वारे सुविधा दिलेल्या महानगरपालिका वेबसाइट ैैै.ज्ीहनत्म्दा ीज्दीीूग्दह.म्दस् वरील लिंक्स आणि ‘झ्श्ण् ऊींX ींझ्झ्” या मोबाइलॲप्लीकेशनमुळे देयकांच्या डिजिटल पद्धतींद्वारे संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. याला मालमत्ताधारकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून येत आहे.
नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरता यावा तसेच महानगरपालिकेच्या कार्यालयात ये-जा करावी लागू नये यासाठी आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार मागीलवर्षी पनवेल महानगरपालिकने ‘झ्श्ण् ऊींX ींझ्झ्”विकसित केले होते. या ॲप तसेच वेबसाईटवरील मालमत्ता कराच्या लिंक अशा डिजीटल माध्यमातून देयक भरण्याच्या संख्येत दिवेंसेदिवस वाढ होताना दिसते आहे. तसेच डिजीटल पध्दतीने कर भरणा केल्यास दोन टक्के सूट असल्याकारणानेही डिजीटल पध्दतीद्वारे देयक भरणाऱ्यामध्ये वाढ होताना दिसते आहे. आतापर्यंतच्या एकूण संकलनापैकी सुमारे ४१ हजार ८२४ नागरिकांनी एकुण मालमत्तांकरापैकी ११० कोटी रुपये डिजीटल पध्दतीने भरले आहेत.
महापालिका हद्दीमध्ये सुमारे साडेतीन लाख नोंदणीकृत मालमत्ता आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त मालमत्ता कर भरावा यासाठी गतवर्षी विभागातर्फे विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, नोटीस, अशा विविध उपाययोजना राबविल्या होत्या. यावेळी चालू आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस पोस्टाद्वारे तसेच ज्या मालमत्ताकर धारकांचे रजिस्ट्रेशन झाले आहे अशा करदात्यांना ईमेल व मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे देयक पाठविण्यात आले आहेत. याबरोबरच मॅन्युअली बिलाचे घरपोच वाटप करण्यात आले आहे. वेबसाईटवरतीही मालमत्ता देयकांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. याबरोबर यावर्षी थेट वसुलीसाठी व जप्तीच्या नोटीसा देण्यासाठी चार प्रभागांमध्ये आठ वसुली पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच येत्या काळात वाणिज्य, औद्योगिक व निवासी मालमत्तांवर देखील जप्तीची कारवाई प्रस्तावित आहे. महापालिका अशा विविध प्रयत्नांमुळे २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत १३५ कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे. नागरिकांना मालमत्ताकरांबाबत काही अडचणी असल्यास १८००५३२०३४० या टोल फ्री क्रमांकारवरती संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
महापालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच यावर्षी केवळ तीन महिन्यात १३५ कोटी रुपयांचा कर वसूली झाली आहे. मालमत्ता कर भरून शहराच्या विकासात योगदान दिल्याबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.
--