धोकादायक इमारतींवर  उरण नगर परिषद  करणार कारवाई

उरण नगर परिषद धोकादायक इमारतींवर करणार कारवाई

उरण  : उरण शहरात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. सदर धोकादायक इमारतींना नोटीसा ही बजावण्यात आल्या आहेत.मात्र  पावसाळा सुरू झाला नंतर ही रहिवाशांनी धोकादायक इमारतींमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उरण नगर परिषद शहरातील धोकादायक इमारतींवर सोमवारी ( दि. ३) कारवाई करणार असल्याचे उरण नगर परिषदेकडून सांगण्यात येत आहे.

सध्या उरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे.तसेच मोठ मोठाली वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडत आहेत.त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी सतर्कत राहण्याचे व पाण्याचा निचरा जलद होण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश उरणचे तहसीलदार डॉ उध्दव कदम यांनी संबंधित अधिकारी वर्गाना दिले आहेत.मात्र उरण नगर परिषदेकडून धोकादायक इमारतींना नोटीसा बजावल्या नंबर ही पावसाळ्यात सदर इमारती मधील रहिवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धोकादायक इमारती मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही.
 
त्यामुळे पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडून जीवित हानी व वित्त हानी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उरण नगर परिषद धोकादायक इमारतींवर सोमवारी ( दि. ३) कारवाई करणार आहे.तसेच सदर धोकादायक इमारती मधिल रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सल्ला देणार आहे. असे उरण नगर परिषदेकडून सांगण्यात येत आहे.
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून जमीन मालकांची अडवणूक