शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
कांदा बटाटा घेताय सावधान?
एपीएमसी बाजार आवारातील फेकलेल्या कांदा-बटाट्याची विक्री?
वाशी : नवी मुंबई शहरात सध्या पावसाचा जोर वाढला असून, पावसाचा वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केटमध्ये दाखल शेतमालावर देखील परिणाम होत आहे. पावसामुळे एपीएमसी बाजार आवारात येणारा शेतमाल काही प्रमाणात खराब होत असल्याने त्याला बाजार आवारातच फेकले जाते. मात्र काही घटक हाच फेकलेला कांदा-बटाटा गोळा करुन स्वस्त दरात विक्रीसाठी नेत असल्याची बाब समोर आली आहे.
वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या ठिकाणी रोज शेकडो वाहने शेतमाल घेऊन दाखल होत असतात. यातील सरासरी २ ते ३ % शेतमाल खराब निघतो. त्यामुळे खराब शेतमाल बाजार आवारात फेकला जातो. त्यानंतर खराब शेतमालाची विल्हेवाट लावली जाते. आता पावसाळी दिवसात पावसामुळे शेतमाल खराब होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामध्ये कांदा-बटाट्याचे प्रमाण अधिक आहे. खराब कांदा-बटाटा गोळा करुन विक्रीसाठी नेत असल्याचे समोर आले आहे. गेल्या मे महिन्यात एपीएमसी फळ बाजार आवारात फेकलेली फळे गोळा करुन ज्यूस बनवण्यासाठी नेत असल्याचे चित्रीत झाले होते. आता एपीएमसी बाजार आवारातील फेकलेला कांदा-बटाटा गोळा करुन विक्रीसाठी नेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एपीएमसी बाजार आवारातील सुरक्षा रक्षक बाजार समितीची कुठली सुरक्षा पाहतात?, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.