अवयवदान व नेत्रदान, पर्यावरण आणि पसायदान विषयावरील व्याख्यानमालेस चांगला प्रतिसाद

नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालय आयोजित व्याख्यानमालेत उपयुवत विषयांवर मार्गदर्शन

नवी मुंबई : नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालय आयोजित कै. डॉ. शं. पां. किंजवडेकर स्मृती व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प   २६ जून  रोजी ज्येष्ठ नागरिक भवनच्या श्री गणेश सभागृहात पसायदान या विषयावर प्राध्यापक सुनील हिंगणे (नाशिक) यांनी गुंफले.  श्री. हिंगणे यांनी अभ्यासपूर्ण असं पसायदानाच निरुपण करताना अत्यंत रसाळपणे पसायदानाचा विषय सोपा करून मांडला. दैनंदिन  जीवनाशी साधर्म्य साधत त्यांनी पसायदान हा विषय अत्यंत मार्मिक पद्धतीने उलगडून दाखविला आणि त्यामुळे माऊलींच्या पसायदानाचं मोठेपण अधिक प्रगल्भपणे अधोरेखित झालं.  

श्रीमती तेजस्विनी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की या व्याख्यानमालेतील तीनही विषय अवयवदान व नेत्रदान तसेच पर्यावरण आणि तिसरे पसायदान अत्यंत समर्पक होते. लोकांच्या सामाजिक जाणीवा विकसित करणाऱ्या व अंतर्मुख करणारी विषय रचना या ठिकाणी मांडल्याबद्दल संयोजकांचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमास विद्याभवन शाळेतील विद्यार्थी व शिक्षिका उपस्थित असल्याबद्दल श्रीमती तेजस्विनी अधिकारी यांनी खूप समाधान व्यक्त केले. ग्रंथालयाचे अध्यक्ष विकास साठे यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साथ देऊन ही संपूर्ण व्याख्यानमाला यशस्वीपणे साकार केली.

या कार्यक्रमात सर्वश्री सुभाष हांडे देशमुख, दत्ताराम आंब्रे, विजय सावंत, मोरेश्वर पवार, दिलीप जाधव, श्रीमती कमल आंगणे यांचा  सामाजिक कार्याबद्दल व सहकार्याबद्दल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास  फेसकॉमचे मुंबई सचिव सुरेश पोटे, पांडुरंग क्षेत्रमाडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, विद्याभवन शाळेचे संचालक दिनेश मिसाळ सर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  यावेळी दीपक दिघे, प्रभाकर गुमास्ते, अजय माढेकर, भालचंद्र माने,  श्रीमती स्वाती फडके या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रमेश गायकवाड यांनी पसायदान म्हटलेे.   संस्थेचे अध्यक्ष विकास साठे यांनी प्रास्ताविक भाषणात ग्रंथालय अधिक लोकाभिमुख व्हावे म्हणून या  व्याख्यानमालेचा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. या कार्यक्रमात कार्यकारणीतील सीमा आगवणे, रमेश गायकवाड, रणजीत दीक्षित, नंदलाल बॅनर्जी,  विजय सावंत,  पी. आर. गुप्ता, सुनील आचरेकर, प्रकाश लाखापते ग्रंथपाल रुपाली माहुलकर  यांचे व्याख्यानमालेच्या कार्यक्रमासाठी मोलाचे साह्य लाभले. सीमा आगवणे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नंबर वनचा निश्चय करीत नवी मुंबईत विद्यार्थ्यांची स्वच्छता दिंडी