कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर!

बहुप्रतिक्षीत मुंबई-मडगांव वंदे भारत एवस्प्रेस आजपासून धावणार

नवी मुंबई : ओडिशाच्या बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या तिहेरी ट्रेन अपघातानंतर लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्यापासून बहुप्रतिक्षीत असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील मुंबई सीएसएमटी-मडगांव वंदे भारत एवस्प्रेस आता आज २८ जून पासून या मार्गावर धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्रेन क्रमांक-२२२२९/२२२३० मुंबई सीएसएमटी-मडगांव जंवशन वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सदर वंदे भारत एवस्प्रेस मान्सूनच्या वेळापत्रकानुसार धावणार आहे.

गाडी क्र.२२२२९ / २२२३० मुंबई सीएसएमटी-मडगाव जं.- मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस (त्रैसाप्ताहिक)ः
गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी- मडगांव जंवशन वंदे भारत एक्सप्रेस २८ जून ते ३० ऑवटोबर २०२३ पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबई सीएसएमटी येथून ५.२५ वाजता सुटून त्याचदिवशी मडगांव जंक्शनला १५.३० वाजता पोहोचेल.

तर ट्रेन क्र.२२२३० मडगांव जंवशन-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस २९ जून ते ३१ ऑवटोबर २०२३ या कालावधीत दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी मडगांव जंक्शन येथून १२.२० वाजता सुटून त्याच दिवशी २२.२५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

मान्सून वगळता वेळापत्रक (शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस)ः गाडी क्र.२२२२९ मुंबई सीएसएमटी - मडगांव जंवशन वंदे भारत एक्सप्रेस १ नोव्हेंबर २०२३ पासून दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार (आठवड्यातील सहा दिवस) मुंबई सीएसएमटी येथून ०५.२५ वाजता सुटून मडगांव जंक्शन येथे त्याच दिवशी १३.१० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्र.२२२३० मडगांव जंवशन-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस १ नोव्हेंबर २०२३ पासून दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार (आठवड्यातील सहा दिवस) मडगांव जंक्शन येथून १४.४० वाजता सुटून त्याच दिवशी २२.२५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

सदर गाडी दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम स्थानकावर थांबेल. या गाडीला एकूण ८ कोच (वंदे भारत रेक) डीटीसी-२, चेअर कार-५, एक्झिक्युटिव्ह चेअर कार-१ असे आहेत.

दरम्यान, प्रवाशांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘रेल्वे'तर्फे करण्यात आले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यान