महापालिका स्थापत्य विभागाचा गलथान कारभार चव्हाटयावर?

पहिल्याच पावसात तुर्भे इंदिरानगर मध्ये पाणीच पाणी

वाशी : नवी मुंबई शहरातील तुर्भे इंदिरानगर येथील बगाडे कंपनी जवळ नवी मुंबई महापालिका स्थापत्य विभागाने केलेले खोदकाम तसेच ठेवल्याने पहिल्याच पावसात याठिकाणी गुडघाभर पाणी भरले होते. तर पाणी भरल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने पाच ते सहा व्यक्ती या खड्ड्यात पडल्याचा दावा शिवसेना (उबाठा) नवी मुंबई उपशहर प्रमुख महेश कोटीवाले यांनी केला असून, त्यांनी महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे.

नवी मुंबई शहरातील नाले सफाई तसेच खोदकामे २५ मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले होते. मात्र, सालाबादप्रमाणे यंदाही झोपडपट्टी भागातील नालेसफाई फक्त कागदावरच झाल्याचे चित्र दिसत आहे. तुर्भे इंदिरानगर येथील बगाडे कंपनी समोर नवी मुंबई महापालिका स्थापत्य विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे मोठ्या प्रमाणात पाणी भरले. या ठिकाणी कल्व्हर्ट बनवण्यासाठी खोदकाम केले आहे. मात्र, सदर खोदकाम ठिकाणी कुठलीही सुरक्षात्मक उपाययोजना न करता खोदकाम तसेच खुले सोडून गाळ देखील तसाच ठेवला होतो. त्यामुळे येथील पाण्याचा निचरा न झाल्याने २५ जून रोजी गुडघाभर पाणी भरले होते. त्यामुळे या ठिकाणी पाणी भरल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने पाच ते सहा व्यक्ती या खड्ड्यात पडल्याचा दावा शिवसेना (उबाठा) नवी मुंबई उपशहर प्रमुख महेश कोटीवाले यांनी केला आहे. 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सामाजिक न्याय दिन म्हणून राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी