‘टायर रिमोल्डींग'चा प्रकल्प रद्द करण्याची विजय घाटे यांची मागणी

‘टायर रिमोल्डींग'चा पांढरा हत्ती कुणासाठी ?

वाशी ः नवी मुंबई महापालिका मध्ये प्रशासक राजवट असल्याने सर्वच महापालिका अधिकारी राजेशाही थाटात वागत आहेत. स्थापत्य विभागाने स्वतःच्या दावणीत अनेक हत्ती बांधल्यानंतर आता महापालिका परिवहन विभागाला देखील राजा बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. परिवहन विभागाने ‘टायर रीमोल्डींग'चा प्रकल्प उभा केला आहे. यात ५६७ बसेसचा आकडा दाखवला आहे. मात्र, यातील ३२० बसेस ठेकेदरास देखभाल, दुरुस्तीसह चालवण्यासाठी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘टायर रीमोल्डींग'चा पांढरा हत्ती नेमका कुणासाठी?, असा प्रश्न ‘भाजप'चे विजय घाटे यांनी उपस्थित करत, त्यांनी सदर प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) तर्फे २२ लाख रुपये खर्च करुन टायर रिमोल्डींग करण्याचा प्रकल्प आसुडगाव आगारात सुरु करण्यात आला आहे. यासाठी ५६७ बसेसचा आकडा दाखवण्यात आला आहे. मात्र, परिवहन उपव्रÀमाकडे १९५ इलेक्ट्रिक बसेस आहेत. त्यापैकी १६५ बसेस या कंत्राटदार चालवतो. तर ३० बसेस एनएमएमटी चालवते. (या ३० बसेस पैकी २४ बसेस वापरात नाहीत) तसेच डिझेल बसेस ३७२ आहेत. त्यापैकी १५५ बसेस  कंत्राटदाराद्वारे चालत आहेत. त्यामुळे २१७ बसेस या एनएमएमटी वापरत आहे. त्यामुळे ५६७ बसचा आकडा संयुक्तिक वाटत नसून, वास्तवात २४७ बस आहेत. त्यामुळे २२ लाखाचा टायर रिमोल्डींग प्रकल्प उभा करुन  त्यावर परिवहन विभागाचे कामगार काम करतील. त्यामुळे टायर रिमोल्डींग प्रकल्प कंत्राटदाराच्या वापरात असलेल्या ३२० बसेससाठी राबवला जात आहे का?, असा सवाल उपस्थित करत ‘टायर रिमोल्डींग' प्रकल्प ‘एनएमएमटी'चा हकनाक खर्च वाढवणारा असून, पांढरा हत्ती ठरणार आहे. त्यामुळे सदर प्रकल्पाचे पुनर्वलोकन करुन ‘टायर रिमोल्डींग' प्रकल्प रद्द करुन ‘टायर रिमोल्डींग' प्रकल्प आउटसोर्स करावा, अशी मागणी विजय घाटे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम तर्फे सुरु करण्यात आलेला ‘टायर रिमोल्डींग' प्रकल्प सध्या तरी परिवहन विभागात कार्यरत असलेले दोन कर्मचारी हाताळत आहेत. त्यासाठी त्यांना एक आठवडा प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती खाजगी सूत्रांनी दिली.
‘नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमच्या बसेसचे टायर रीमोल्डींग करण्यासाठी आसुडगाव येथे प्रकल्प सुरु केला आहे.  मशिन द्वारे एनएमएमटी स्वतः टायर रीमोल्डींग करणार असल्याने १५ ते २० टवव्ोÀ खर्च वाचणार आहे. - अनिल शिंदे, वाहतूक व्यवस्थापक - नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अमृत २.० अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी