नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेतर्फे ‘संघर्षाचे ऊर्जास्थान-दि.बा. पाटील' स्पर्धेचे आयोजन 

‘संघर्षाचे ऊर्जास्थान-दिबा' या स्पर्धात्मक उपक्रमाचे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजन

तुर्भे - प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या समर्पित कार्यास उजाळा देऊन त्या माध्यमातूनन युवा पिढीला संघर्षासाठी प्रेरीत करणे, या उद्देशाने नवी मुंबई स्तरावर ‘संघर्षाचे ऊर्जास्थान-दिबा' या स्पर्धात्मक उपक्रमाचे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते  दशरथ भगत यांनी दिली. 

विजेत्यांना एकूण १० लाख रक्कमेच्या बक्षिसांसह सन्मानचिन्ह व  प्रशस्तीपत्रक देऊन विशेष सन्मान सोहळ्यात गौरविण्यात येणार असल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले. 

           लोकनेते दि. बा. पाटील यांच्या १०व्या स्मृतिदिनानिमित्त वाशीगाव येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष तथा नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते  दशरथ भगत यांनी या उपक्रमाची घोषणा केली आहे. या वेळी स्थानिक माजी नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत, नमुंमपा शाळा क्र. २७ च्या मुख्याध्यापिका प्राची ठाकूर यांच्या सह शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि वाशीगाव ग्रामस्थ यांनी दि. बां ना आदरांजली अर्पण केली. या वेळी सर्व वाशीगांव महापालिका शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान, गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव व वृक्षारोपण असे दि बां ना समर्पित कार्यक्रम राबवण्यात आला.

       या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या  स्पर्धेकांनी लोकनेते दिबांच्या संघर्ष जीवनावर प्रोजेक्ट तयार करणे,  व्हिज्युअल डॉक्युमेंटरी बनविणे, दिबांच्या जीवनप्रवासावर स्फुर्तीगीते बनविणे, दि . बांच्या विविध आंदोलनांच्या चित्रांचे रेखाटन करणे, यासह यंदाच्या श्रीगणेशोत्सवात काळात गणपतीसमोर याच विषयावर घरगुती व सार्वजनिक मंडळ अशा दोन्ही स्तरावर आरास हा विषय देखील या स्पर्धा उपक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. सदर उपक्रम केवळ नवी मुंबई महापालिका हद्दीतील सर्व क्षेत्रातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मर्यादित आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘टायर रिमोल्डींग'चा प्रकल्प रद्द करण्याची विजय घाटे यांची मागणी