टॉयलेटचे आयुवत राजेश नार्वेकर, माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते लोकार्पण

‘एनएमएमटी'च्या मोडकळीस आलेल्या ४ बसेसचे टॉयलेटमध्ये रुपांतर

नवी मुंबई ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त मोदींनी देशभरात व्ोÀलेल्या विकास कामांचा अहवाल घराघरात पोहोचविण्याचे काम ‘भाजपा'च्या पदाधिकाऱ्यांमार्फत सुरु आहे. नवी मुंबई महापालिव्ोÀच्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई  म्हात्रे यांच्या ‘टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेतून मोडकळीस आलेल्या ४ बसेसचे रुपांतर करुन महिला-पुरुषांकरिता २ बसेस टॉयलेटसाठी उपलब्ध करुन देण्यात  आल्या आहेत. पहिल्या बसचे उद्‌घाटन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते तर दुसऱ्या बसचे उद्‌घाटन माजी महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यासमवेत ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, जिल्हा महामंत्री निलेश म्हात्रे, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, महापालिका शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, ॲड. सुहास वेखंडे, जगन्नाथ जगताप, पांडुरंग आमले, गुणाबाई सुतार, जयश्री चित्रे तसेच ‘भाजपा'चे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सायन-पनवेल महामार्गावर जुईनगर रेल्वे स्थानकासमोर हर्डिलिया कंपनी लगत लांब पल्ल्याच्या खाजगी बसेस उभ्या असतात. नवी मुंबईतील असंख्य नागरिक येथून प्रवास करीत असतात. जेणेकरुन विशेषतः महिला प्रवाशांसाठी तिथे शौचालायची व्यवस्था नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला-पुरुष यांच्यासाठी सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक बस टॉयलेट असावे या अनुषंगाने  माझ्या आमदार निधीमधून नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमामधील मोडकळीस आलेल्या ४ एनएमएमटी बसेसचे रुपांतर अत्याधुनिक टॉयलेटमध्ये करण्यात आले आहे. यातील महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी २ बसेसचे लोकार्पण करण्यात आले, अशी माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.
अजुनही सायन-पनवेल हायवे लगत जिथे मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा असते, त्या ठिकाणी २० बसेसची व्यवस्था आणि प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाणार असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
आज आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून ज्या महापालिकेच्या परिवहन विभागातील मोडकळीस आलेल्या बसेसचे रुपांतर टॉयलेटमध्ये करुन महिला आणि पुरुषांकरिता शौचालय उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे नाविन्यपूर्ण संकल्प आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून पहावयास मिळाले. त्यामुळे सायन-पनवेल हायवेमार्गावरील प्रवाशांना एक सुविधा उपलब्ध झाली असून अजुन अशा जुन्या बसेसची गरज लागेल त्यावेळेस महापालिकेच्या वतीने मोडकळीस आलेल्या बसेस उपलब्ध करुन दिल्या जातील, असे आयुवत राजेश नार्वेकर यांनी सांगितले.  

एका स्त्रीला लाली-टिकली पावडर लावून सजवितात, अशाच प्रकारे ‘एनएमएमटी'च्या मोडकळीस आलेल्या ४ बसेसचे रुपांतर टॉयलेटमध्ये करण्याची संकल्पना फक्त आणि फक्त एका स्त्रीलाच सुचली, असे गौरवोद्‌गारही आयुवत नार्वेकर यांनी यावेळी काढले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेतर्फे ‘संघर्षाचे ऊर्जास्थान-दि.बा. पाटील' स्पर्धेचे आयोजन