ठाणे महापालिका शाळांतील दहावीत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळयाचे आयाेजन

आयुक्त बांगर यांनी साधला ठामपा शाळांमधील दहावीच्या ‘टॉपर्स'सोबत मनमोकळा संवाद

ठाणे ः दहावीनंतर पुढे काय करणार.. कोणत्या शाखेत प्रवेश घ्ोणार.., पुढे कोणत्या क्षेत्रात करियर करायला आवडेल या सोबतच भविष्यात काय व्हायला आवडेल अशा या आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांना इंजिनीयर.., डॉक्टर.., प्रोफेसर.. पोलीस तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणार अशी उत्तरे देत विद्यार्थ्यांनी देखील महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेसोबत मनमोकळा संवाद साधला, निमित्त होते ठाणे महापालिका शाळांतील दहावीत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळयाचे..ठाणे महापालिका शाळांमधील सव्रााधिक गुण प्राप्त केलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच महापालिकेतील कै. अरविंद पेंडसे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. दहावीच्या परीक्षेत सव्रााधिक गुण प्राप्त करणाऱ्या कु.सुफयान अन्सारी (९१ टक्के- शाळा क्र. ११, मुंब्रा), कु.सॉलेहा शेख (९०.६० टक्के, शाळा क्र. ११ मुंब्रा), कु. प्राची गायकवाड (८८.६० टक्के, शाळा क्र. ०७ मानपाडा), कु. समिक्षा वाजे (८८.४० टक्के, शाळा क्र. १५ किसननगर), कु. बुशरा खातून शेख (८८.०० टक्के शाळा क्र. १३, कौसा) या विद्यार्थ्यांचा गौरव आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी व्यक्त केला लॅपटॉप मिळाल्याचा आनंद मुलांच्या कौतुकाबरोबरच मुलांच्या पालकांना पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला, तर मुलांना पुस्तके, पेन व लॅपटॉप देण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना केवळ संधीचा अभाव असल्यामुळे आपल्या कर्तृत्वाला साजेसे यश मिळवता येत नाही. गुणवंताच्या बाबत अशी बाब घडू नये यासाठी मनपा शाळेतील पाच गुणवंत विद्यार्थ्यांना सीएसआरच्या माध्यमातून लॅपटॉप देण्याचा निर्णय आयुक्त अभिजीत बांगर यांनी घ्ोतला व त्याची यावर्षीपासून सुरूवात झाली. या लॅपटॉपचा वापर कसा करणार? लॅपटॉपच्या माध्यमातून भविष्यातील कशी मदत होईल यावर सुद्धा मुलांनी मोकळेपणाने उत्तरे दिली व लॅपटॉप मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
शाळांमध्ये वाचनाचा तास ठेवावा.

मुलांना वाचनाची आवड लागावी यासाठी शाळांमध्ये वाचनांचा एकतास ठेवणे गरजेचे आहे. किमान रोज एक तास जरी मुलांनी विविध पुस्तके वाचली तर त्यांना आपोआपच सवय लागून आवड निर्माण होईल यासाठी प्रत्येक शाळेत वाचनालय करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

संगणकाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टीने ठामपाच्या सर्व शाळांमध्ये संगणक उपलब्ध होतील या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी शिक्षणाधिकारी यांना दिल्या.

मराठी माध्यमांच्या शाळांचा दर्जा वाढविण्याबरोबरच इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढणेही तेवढेच गरजेचे असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनीही विद्यार्थ्यांनी मेहनत घ्ोवून चांगले गुण प्राप्त केले याचा ठाणे महापालिकेला निश्चितच अभिमान असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाप्रबंधक राजकिशोर रणजीत तसेच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवैध विक्रीकडे एपीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष