अवैध विक्रीकडे एपीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष

भाजीपाला मार्केटमध्ये नियमबाह्य पध्दतीने कांदा-बटाटा विक्री
 

वाशी ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार संकुलातील भाजीपाला बाजार आवारात दिलेल्या परवानगीचा गैरफायदा घ्ोऊन काही व्यापाऱ्यांनी भाजीपाला मार्वेÀट मध्ये कांदा-बटाटा, लसूणची विक्री सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे या साऱ्या प्रकाराकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने कांदा-बटाटा बाजार आवारातील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाशीतील कृषी उत्पन्न बाजारपेठ घाऊक बाजार म्हणून प्रसिध्द आहे. या ठिकाणी राज्य तसेच परराज्यातील शेतमाल, धान्य, मसाले, आदी विक्रीसाठी येतात. त्यासाठी फळ, भाजी, कांदा-बटाटा, धान्य आणि मसाला मार्केट अशा पाच बाजार आवारातून बाजारपेठ व्यापली आहे. त्या त्या ठिकाणी त्याप्रमाणे मालाची विक्री होत असून इतर मालाच्या विक्रीला मनाई आहे.

बाजार समिती मोठी असल्याने या ठिकाणी उपहारगृहे, हॉटेल आहेत. येथील हॉटेल, उपहारगृहात बाहेरील वस्तू आवक साठी एपीएमसी प्रशासनाने विशेष परवानगी दिली आहे. अशाच परवानग्या भाजीपाला बाजार आवारातील उपहारगृह, हॉटेल आणि जेलमधील भाजीपाला पुरवठादार अशा एकूण २६ जणांना देण्यात आल्या आहेत.
मात्र, भाजीपाला बाजार आवारात अशा परवानग्यांचा काही व्यापाऱ्यांनी गैरफायदा घ्ोत भाजीपाला आवारात थेट कांदा-बटाटा आणि लसणाची विक्री सुरु ठेवली आहे. त्यामुळे परवानगी नसताना देखील काही व्यापाऱ्यांनी भाजीपाला बाजारात कांदा-बटाटा, लसणाची विक्री सुरु ठेवली आहे. या साऱ्या प्रकाराकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येथील कांदा-बटाटा बाजार आवारातील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिकेला मालमत्ता कर भरण्यासंदर्भात औद्योगिक क्षेत्रातून उत्तम प्रतिसाद