वर्षाला सरासरी ३०० मांजरींचे लसीकरण

 महापालिकेच्या मांजर लसीकरण, निर्बिजीकरण केंद्राचे उद्‌घाटन

पनवेल : पनवेल महापालिका तर्फे भटक्या मांजराचे लसीकरण आणि निर्बिजीकरण केंद्र पोदी येथील श्वान नियंत्रण केंद्राच्या वरील मजल्यावर सुरु करण्यात आले असून, या केंद्राचे उद्‌घाटन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते २२ जून रोजी करण्यात आले.

यावेळी महापालिका उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, पशुधन वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान गीते, मुख्य सर्जन डॉ. हनुमान घनवट, प्रभाग अधिकारी रोशन माळी, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, अरुण कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

भटक्या मांजराच्या संख्येवर नियंत्रण आणण्याकरिता भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जसा नसबंदी कार्यक्रम राबविण्यात येतो, त्याच धर्तीवर भटक्या माजंरासाठी नसबंदी कार्यव्रÀम राबविण्याची सूचना ‘ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया' द्वारे महापालिकेस करण्यात आली होती. त्यानुसार ‘इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स इंडिया' या संस्थेच्या माध्यमातून महापालिकेने भटक्या मांजराचे लसीकरण आणि निर्बिजीकरण केंद्र सुरु केले आहे.

या केंद्रामध्ये पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील भटक्या मांजरींचे लसीकरण आणि निर्बिजीकरण केले जाणार आहे. वर्षाला सरासरी ३०० मांजरींचे लसीकरण आणि निर्बिजीकरण तसेच २०० आजारी मांजरींवर औषधोपचार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या या केंद्रामध्ये दर मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवशी मांजरीचे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण आणि निर्बिजीकरण करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या लसीकरण आणि निर्बिजीकरण केंद्रात चार रुग्णवाहिका असून, या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून भटकी कुत्री आणि भटकी मांजरे पकडण्यात येणार आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाण्यातील खाडी किनारा व तलावांची जिल्हास्तरीय समितीने केली पाहणी