वंध्यत्व निवारण्याबाबत चांगली जागरुकता

वंध्यत्व केवळ आजार नाही तर सामाजिक समस्याही -डॉ.नंदिनी पालशेतकर

 मुंबई : मुल न होणे हे आजारापुरतेच मर्यादित नाही, तर आपल्याकडे ती एक सामाजिक समस्याही बनून राहिली आहे. अनेक स्त्रिया त्यासाठीच्या तपासणीसाठीही पुढे येणे टाळतात. पण लाईफ सेलने नवीन संशोधन करत शोधलेले टेस्टींग किट्‌स हे या क्षेत्रात क्रांती घडवणारे असल्याचे इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रेप्रॉडवशनच्या अध्यक्ष डॉ. नंदिनी पालशेतकर यांनी २१ जून रोजी सांगितले.

हे सेल्फ किट्‌स सामाजिक दबलेपणा  किंवा भीडेखातर आजार लपवण्याच्या समस्येवर उपाय ठरणारे असून आता स्त्रिया अथवा पुरुषांना खासगीपणे टेस्ट करण्याचे पर्याय उपलब्ध झाले आहेत आणि यामुळे वंध्यत्व निवारणाबाबत चांगली जागरुकताही निर्माण होईल असेही डॉ.नंदिनी म्हणाल्या. लाईफसेलच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्पर्मस्कोअर, ओव्हास्कोअर आणि इंफरजीन्स प्रकारच्या सेवा पुरवून जोडप्यांना त्यांच्या प्रजनन क्षमतेविषयी माहिती समजणार आहे. अनेक जोडप्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना स्पर्मव्हॉल्ट, आणि ओव्हाव्हॉल्ट अशा प्रिझर्वेशन सेवाही दिल्या जाणार असल्याचे लाईफसेलचे व्यवस्थापकीय संचालक मयूर अभाया यांनी स्पष्ट केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवघ्या ३ महिन्यात १२६ कोटी रुपयांची वसुली