शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
विविध संस्था ‘दिबां'च्या स्मृतिदिनानिमित्त रवतदान शिबिरासाठी एकवटल्या
‘दि.बां'च्या स्मृतिदिनानिमित्त रवतदान शिबिरात होणार रवतदात्यांचा सन्मान
पनवेल : शेतकरी, श्रमिकांसाठी आपले रवत सांडणाऱ्या माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांच्या १० व्या स्मृतिदिनी, २४ जून रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० दरम्यान पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील कार्यालयात भव्य रवतदान शिबिराचे आयोजन केले आहे. याच दिवशी महात्मा फुले सभागृहात रोजगार मेळाव्याचे आयोजन लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब सर्वपक्षीय कृती समितीच्या सहयोगाने केले आहे.
रवतदान शिबिरास लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समिती, रामशेठ ठाकुर सामाजिक विकास मंडळ, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, आगरी-कोळी-कराडी संघर्ष सामाजिक संस्था, कच्छ युवक संघ-अँकरवाला रवतदान अभियान, महात्मा फुले सा.प्र.प. प्रतिष्ठान जासई, दुर्ग मावळा प्रतिष्ठान, आम्ही पिरकोनकर समूह, शावत शिवराज्यभिषेक समारंभ समिती रायगड, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना जुई कामोठे, सह्याद्री मित्र मंडळ, भिंगारवाडी आदिसंस्था या रवतदान शिबिरास सहकार्य करणार आहेत. रवतदात्यांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी रवतदान व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अतुल दि. पाटील, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, चेतन साळवी, अनंतराव पाटील सचिव बी. पी. म्हात्रे, कोषाध्यक्ष व शिबीर संयोजक विजय गायकर यांनी केले आहे.