शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
योग शिबिरास ज्येष्ठांसह विविध वयोगटातील व्यवतींनी लावली हजेरी
तीन दिवसीय योग शिबिराची सांगता
ऐरोली : येथील श्री संत सावतामाळी मंडळाच्या वतीने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून तीन दिवसांच्या योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योग प्रशिक्षक श्री गाभणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोलीकरांनी या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद दिला.
योगाभ्यास हा जीवनाचा अविभाज्य भाग असायला पाहिजे असे श्री संत सावता माळी मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत थोरात यांनी सांगितले. बदलती जीवनशैली, बदलता आहार, मानसिक ताण तणाव या सर्वांचा परिणाम मानवी शरीरावर होत असल्यामुळे मानवाचे स्वास्थ्य व आरोग्य धोक्यात आले आहे असे दिसून येते. त्यामुळे या समस्येतून बाहेर येण्यासाठी योगा हा उत्तम व्यायामाचा प्रकार आहे, ज्यामुळे आपले मन शांत होण्यास व माणसाची अंतःर्भूत शक्ती वाढविण्यास मदत होते. योगामुळे शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते. भारताच्या विशेष प्रयत्नाने संपूर्ण जगात योगाभ्यास पोहोचला आहे. म्हणूनच २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगभर अतिशय उत्साहात साजरा केला जातो, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
याप्रसंगी करोना काळामध्ये धारावीसारख्या ठिकाणी मोलाची कामगिरी बजावणारे व कित्येकांचे प्राण वाचवणारे करोना योध्दे डॉ. धनंजय मोरे यांचा सत्कार करण्यात आला. सदर योग प्रशिक्षण शिबिरासाठी श्री संत सावता माळी मंडळाचे रोहित भुजबळ, मारुती बनकर, हरिश्चंद्र भुजबळ, नामदेव डोके, संपत जाधव, राजेंद्र फुलसुंदर, महादेव शिंदे, संतोष नारायण शिंदे, बाळासाहेब ढोपे, शंकर डोके, शितल शिंदे, निकिता लोखंडे, समाजसेवक रविंद्र औटी, समाजसेवक अरुण पडते आणि ऐरोली नगरातील मोठ्या संख्येतील ज्येष्ठ नागरिक व रहिवाशांनी हजेरी दर्शवली.