१३ ते १६ जून दरम्यान ‘सिडको'च्या अनधिकृत बांधकामे विभागातर्फे विशेष मोहीम

‘सिडको'तर्फे १० बेकायदेशीर होर्डींग जमीनदोस्त

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये ‘सिडको'च्या हद्दीत बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर (होर्डींग) ‘सिडको'ने जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. ‘सिडको'च्या अनधिकृत बांधकामे नियंत्रक विभागाने मागील तीन दिवसांमध्ये सायन-पनवेल महामार्गालगत खारघर ते कंळबोली दरम्यान मार्बल मार्केट पर्यंत उभारण्यात आलेल्या १० अनधिकृत जाहिरात फलकांवर (होर्डींग) विशेष निष्कासन मोहिम राबविली. या मोहित सदर जाहिरात फलके (होर्डींग) हटविण्यात आली.  

नवी मुंबई, पनवेल आणि आजुबाजुच्या भागात रस्त्याच्या बाजुला अनेक अनधिकृतपणे होर्डींग उभारण्यात आली आहेत. या अनधिकृत होर्डींगवर मोठमोठ्या जाहिरातबाजी करुन होर्डींग लावणारे ठेकेदार दरदिवशी लाखो रुपये कमवत आहेत. सदर होर्डींगमुळे शहराला बकाल स्वरुप येत असल्याचे तसेच ते धोकादायकरित्या उभारण्यात आल्याच्या तक्रारी अनेकांनी ‘सिडको'कडे केल्या होत्या. त्यानंतर ‘सिडको'ने शहरातील अनधिकृत होर्डींगची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाईला सुरुवात केली आहे.  

१३ ते १६ जून दरम्यान ‘सिडको'च्या अनधिकृत बांधकामे विभागाच्या वतीनेे मुख्य नियंत्रक यांच्या मार्गदर्शनाखाली सायन-पनवेल महामार्गालगत खारघर ते कंळबोली दरम्यान मार्बल मार्केट पर्यंत उभारण्यात आलेल्या १० अनधिकृत होर्डींगवर विशेष निष्कासन मोहिम राबविण्यात आली. तसेच सदर होर्डींगही हटविण्यात आले. अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी, सिडको पोलीस पथक, ‘सिडको'चे सुरक्षा रक्षक आणि ‘महाराष्ट्र सुरक्षा मंडळ'चे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने सदर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी २ गॅस कटर, १५ कामगार वापरण्यात आले.  

‘सिडको'तर्फे कारवाई करण्यात आलेले जाहिरात फलक (होर्डींग) ‘सिडको'च्या प्रचलित नियमावली आणि धोरणांचा भंग करुन तसेच सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे सदर होर्डींग निष्कासित करण्यात आले. शहरातील इतर जाहिरात फलकांची माहिती घेण्यात येत असून त्यात अनधिकृत असलेल्या होर्डींगवर देखील अशाच प्रकारे निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे. - सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी-सिडको. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘वसुधैव कुटुंबकम्‌करिता योग' संकल्पना ‘योग दिन'ची टॅगलाईन