एकाधिकारशाही रोखण्यासाठी एकजूटीचे प्रयत्न

 डॉ. विश्वंभर चौधरी नवी मुंबईत येणार

नवी मुंबई : सध्याचे सामाजिक राजकीय सांस्कृतिक वातावरण ढवळून निघाले असून राजकारण हे कधी नव्हे इतकं असहिष्णु आणि आक्रमक झालं असल्याामुळे समाजजीवनाची समाजकारण, संस्कृती, शिक्षण, अर्थकारण ही बाकीची अंगंही विशविशीत होताना दिसू लागली आहेत. याविरोधात पुन्हा एकदा निर्भय बनो आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याची तयारी सुरु करण्यात आली असून त्याचा एक भाग म्हणून येत्या २९ जून रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी नवी मुंबईत येत आहेत.

लोकशाही ही आपल्या देशाची प्राणशक्ती आहे. पण तिचे खच्चीकरण करायचं काम सध्या सुरु असल्याने एक देश, एक भाषा, एक धर्म अशी वाटचाल सुरु झाली आहे. ज्या महामानवांनी आपलं रक्त सांडून आणि रक्त आटवून देश स्वतंत्र केला व संविधानाच्या भक्कम पायावर उभा केला त्याची आपल्या डोळ्यांदेखत मोडतोड चालू असल्याचे सांगत एकाधिकारशाही म्हणजेच हुकूमशाहीकडे निघालेल्या सध्याच्या सरकारला रोखलं नाही तर गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकर यांचा पराभव करण्यात आपण वाटेकरी होऊ हे होऊ द्यायचं नसेल तर निर्भय बनो अशी हाक देण्यात आली आहे. वाशीच्या भावे नाट्यगृहात २९ जून रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान पार पडणाऱ्या विशेष कार्यक्रम प्रसंगी ॲड. असीम सरोदे, प्रमोद मुजुमदार हे वक्तेही आपले विचार मांडणार आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी बाजारात प्रतिदिन अवघे १५० बॉक्स दाखल