शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
परिवर्तनवादी अंधश्रध्दा निर्मुलन कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समविचारी संघटनेशी संवादसत्र
नवी मुंबई : महाराष्ट्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नवी मुंबई जिल्ह्यातर्फे तर्कशील सोसायटी, पंजाब या समविचारी संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. हे संवादसत्र १८ जून रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या कालावधीत कोपरखैरणे येथे पार पडले.
तर्कशील सोसायटी पंजाब, या समविचारी संघटनेच्या राज्य कार्यकारी समितीचे सोशल मिडिया प्रभारी संदीप धारीवाल भोजा यांच्याशी संवाद करण्यात आला. त्यांना महा. अंनिसची स्थापना व संघटनेच्या विविध पातळ्यांवर चालणाऱ्या कामाची ओळख करून देण्यात आली. महा. अंनिसच्या विशेष प्रयत्नाने अंमलात आलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती करून देण्यात आली. जादूटोणाविरोधी कायद्यामुळे महाराष्ट्रात चमत्काराचा दावा कोणी करत नाही. या कायद्याच्या प्रचार व प्रकारामुळे अंधश्रद्धेतून फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन शिक्षा झालेल्या आहेत. ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका' या संघटनेच्या मुखपत्राची माहिती देण्यात आली. संदिप धारीवाल भोजा यांनी तर्कशील सोसायटीच्या कामाचे स्वरूप सांगितले. तर्कशील सोसायटी पंजाबमधील परिवर्तनवादी संघटनांमधील प्रमुख संघटना असल्याची माहिती त्यांनी दिलीे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात आपण परस्परांच्या संपर्कात राहून काम करुया असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सदर संवाद सत्रात गजानंद जाधव, महेंद्र राऊत, प्रदीप कासुर्डे, अरूण जाधव, अशोक निकम कार्यकर्ते सहभागी झाले होते.