शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते पोलीस आयुवतालयातील ‘हिरकणी कक्ष'चे उद्घाटन
जिल्ह्यातील ४ महिलांचा ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार'ने गौरव
ठाणे : महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील चार महिलांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार'ने राज्याचे उत्पादन शुल्क तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‘महिला-बालविकास विभाग'च्या वतीने सदर पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार किसन कथोरे, ‘ठाणे'चे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जित सिंग, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा महिला-बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, आदि उपस्थित होते.
महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्ह्यातील काशीबाई एकनाथ जाधव, शोभा दीपक वैराळ, अनिता दळवी आणि सारिका भोईटे पवार यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, १० हजार रुपये रोख, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
‘हिरकणी कक्ष'चे उद्घाटन...
‘महिला-बालविकास विभाग'च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या ‘हिरकणी कक्ष'चे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जय जित सिंह, महिला-बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच पोलीस आयुक्तालयात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. त्यामध्ये लहान मुले घ्ोऊन येणाऱ्या महिला तसेच स्तनदा मातांचा समावेश असतो. या महिलांना त्यांच्या लहान मुलांना खाऊ घालणे आणि स्तनपानासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी या ‘हिरकणी कक्ष'ची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये आरामाची सोय, पाण्याची व्यवस्था, मुलांसाठी खेळणी, आदिंची सोय करण्यात आली आहे.
यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयातही हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील गर्दीच्या विविध सात ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात येणार आहेत.